शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वितरिकांना कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा

By admin | Updated: May 11, 2017 04:19 IST

नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. मात्र, इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका अजूनही कोरड्याच आहेत. या भागातील विहिरी व विंधनविहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील शेतपिके व जनावरांचा ओला चारा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नीरा डावा कालव्यावरील वितरिका क्र. ४२ व ४३ यांना पाणी सोडण्याची मागणी होत आहे. इंदापूरच्या पश्चिम भागातील वितरिकांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आर्वतन सुरू आहे. आर्वतन सुरू होऊन ५० दिवस उलटले, तरीदेखील इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिका क्र. ४२ व ४३ ला पाणी सोडले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलच या भागातील विहिरी व विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. या भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. नीरा डावा कालव्यावरील विनापरवाना सायफन जोरात सुरू असल्याने बड्या धेंडांची चलती होत आहे. तर, छोटे शेतकरी मात्र पाण्याची वाट पाहत आहेत. या भागात कालव्यावर अनधिकृत सायफनचे मोठ्या प्रमाणावर जाळे आहे. त्यामुळे पाणी कमी दाबाने मिळत असल्याने शेतीचे भरणे होत नाही. याचा फटका मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर मोहीम राबवून अनधिकृत सायफनधारकावर कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी या भागातील शेतकरी करीत आहेत. या भागात राजकीय पुढाऱ्यांचीदेखील अनधिकृत सायफन असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, या वर्षी उष्णतेची दाहकता जास्त आहे. इंदापूरच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत असल्याने आपल्याला पिण्यासाठी पाणी सोडावे लागले. तसेच, या वर्षी उष्णतेमुळे पाण्याचे बष्पीभवन आणि शेतातदेखील पाणी जास्त द्यावे लागत आहे. या वितरिकांना पाणी सोडण्यास विलंब होत आहे. १४ तारखेला या वितरिकांना पाणी सोडू, असे त्यांनी सांगितले.