नगरसेवक संजय संघवी यांच्याशी चर्चा करुन हा किट वाटपाचा निर्णय झाला. आदेश वडूजकर यांनी या कामी सहकार्य केले. जायंटस सहेलीच्या अध्यक्षा नुपूर वडूजकर, वंदना संघवी, डॉ. उज्वला कोठारी, सोनल खटावकर, वंदन गुजर, दुरय्या दाहोदवाला, झैनब आनंदवाला, इकबाल डीन आदींच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांच्याकडे हे किट सुपूर्द केले गेले. या किटचा वापर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाशी दोन हात करताना होणार आहे. पौर्णिमा तावरे व किरणराज यादव यांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी सेफ्टी किट नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांना प्रदान करताना नुपूर वडूजकर, वंदना संघवी, संजय संघवी व आदेश वडूजकर.
०४०५२०२१बारामती—०३
————————————
जहिरातदारांची बातमी असल्याने फोटोसह सविस्तर घ्यावी.