शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागातल्या १९ नवउद्योजकांना दीड कोटीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

पुणे : केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पुणे विभागातल्या सदर योजनेंतर्गत १९ नव उद्योजकांना १ कोटी ४० ...

पुणे : केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पुणे विभागातल्या सदर योजनेंतर्गत १९ नव उद्योजकांना १ कोटी ४० लाख ८७ हजार रुपयांचे अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. सन २०२१-२१ या अर्थिक वर्षाासाठी एकूण ५१ नवउद्योजकांचे अर्ज आले होते.

समाज कल्याण विभागाच्या पुणे कार्यालयाने छाननी करून सातारा जिल्ह्यातील ९ अर्जदारांना ५५ लाख २५ हजार रुपये, सांगली जिल्ह्यातील ९ अर्जदारांना ७३ लाख ३ हजार रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील २ अर्जदारांना १२ लाख ५९ हजार रुपये अशी मदत केली. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना १०% स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित १५% रक्कम राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येत आहे.

केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये ‘स्टँड अप इंडिया’ ही योजना घोषित केलेली आहे. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता ‘मार्जिन मनी’ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप’ योजनेंतर्गत राज्यात सवलती घेण्यास पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्याना ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्याने त्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या जास्त पंधरा टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून दिला जातो. या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी जास्तीत जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी केले आहे.