शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

‘लोकमत काव्यऋतू’चे आज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 04:34 IST

प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे. 

ठळक मुद्देरंगणार पुरस्कार प्रदान सोहळा प्रतिभावंत कवींचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रतिभाशाली कवींना नवे व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘काव्यऋतू’ या लोकमत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि. १३) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. या निमित्ताने राज्यातील नामवंत कवींची काव्यमैफल देखील रंगणार आहे. युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘काव्यऋतू’ या स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या सुमारे २ हजारांहून अधिक कवितांतून विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये योगिता पाटील (चोपडा, जळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक अँड. अशोक बनसोडे यांनी तर तृतीय क्रमांक पांडुरंग सुतार (जळगाव) यांनी मिळवला आहे. याशिवाय रोशनकुमार पिलेवान (पिंपळगाव), प्रा. मीनल येवले, डॉ. संजय कुलकर्णी (उदगीर), चित्रा क्षीरसागर (ताळगाव, गोवा), उमेश घेवरीकर (शेवगाव) यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या कवितांमधून प्रतिभावंत कवींची निवड करण्यासाठी मान्यवर व अभ्यासू परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये ज्येष्ठ कवी व वातट्रिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोहर जाधव,  डॉ. नीलिमा गुंडी यांचा समावेश होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे व कवी अशोक नायगावकर, कवी संदीप खरे, कवी वैभव जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कवींना गौरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून सुरुवातीच्या काही रांगा निमंत्रितांसाठी राखीव आहेत. 

काव्यप्रेमींसाठी पर्वणीपुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामांकित कवींना एका व्यासपीठावर आणून त्यांचे कवीसंमेलन होणार आहे. ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर यांच्यासह कवी संदीप खरे, वैभव जोशी, भरत दौंडकर, अंकुश आरेकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, तुकाराम धांडे, कल्पना दुधाळ आदी गाजलेले कवी त्यांच्या कविता सादर करणार आहेत. त्यामुळे काव्यप्रेमींसाठी ही खरी काव्यपर्वणी ठरणार आहे. 

टॅग्स :lokmat.com family No. 1lokmat.com फॅमिली No. 1