शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८० हजार ट्रक भंगारात

By admin | Updated: December 6, 2015 03:16 IST

केंद्र शासनाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुने ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल ८० हजार ट्रक भंगारात निघणार आहेत. पुढील वर्षी १ एप्रिल

पुणे : केंद्र शासनाने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी १५ वर्षे जुने ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय घेतल्याने पुणे जिल्ह्यातील तब्बल ८० हजार ट्रक भंगारात निघणार आहेत. पुढील वर्षी १ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने या निर्णयाचा निषेध केला असून, हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली. याबाबत निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे व्यवस्थापकीय सदस्य बाबा शिंदे यांनी दिला आहे.देशातील शहरांमधील हवेची स्थिती गंभीर बनल्याने त्यात प्रामुख्याने जुन्या वाहनांचा समावेश असल्याने १५ वर्षांहून अधिक जुनी व्यापारी वाहने येत्या १ एप्रिलला बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याची अधिकृत सूचना येत्या १० दिवसांत काढली जाणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका पुणे जिल्ह्यातील वाहतूक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. देशभरात २७ लाख ट्रक १५ वर्षांहून जुने आहेत. त्यापैकी जवळपास ८० ते ९० हजार ट्रक एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे मालवाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. प्रत्यक्षात या वाहनांचे आयुर्मान ठरविण्यासाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि आणि केंद ्रशासनामध्ये गेल्या पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसतानाच केंद्राकडून हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने मालवाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वाळू, साखर, गूळ, तसेच भाजीपाला, ऊस आणि डबर वाहतुकीसाठी जुनी वाहने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ती लोकल वाहतुकीसाठी म्हणजेच २० ते ४० किलोमीटरच्या वाहतुकीसाठी वापरली जातात. केंद्र शासनाचा निर्णय मोठ्या शहरांच्या प्रदूषणाची निगडित आहे. तर ही मालवाहतूक प्रामुख्याने आंतरजिल्हा होते शहरात नाही. त्यामुळे ही वाहने भंगारात निघाल्यास हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. (प्रतिनिधी)परिवहनमंत्र्यांना देणार निवेदनया निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी येत्या सोमवारी (दि.७) रोजी संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे बाबा शिंदे यांनी सांगितले.