कुकडी डाव्या कालव्यावर ( चोंभूत ) येथून नदीला पाणी सोडण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक मदतीमधून बांधण्यात आलेल्या विमोचन ( गेट ) उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. या वेळी आमदार नीलेश लंके, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे सभापती प्रशांत गायकवाड, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, उपविभागीय अधिकारी संतोपकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख,जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, घोडगगाचे संचालक राजेंद्र गावडे,भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, कुकडी चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर, उपविभागिय अधिकारी सुहास साळवे,पंचायत समितीच्या सदस्या अरुणा घोडे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी,जांबुतच्या माजी सरपंच डॉ. जयश्री जगताप, सोपानराव भाकरे, नीलेश पडवळ , ग्रामस्थ उपस्थित होते .
पोपटराव गावडे म्हणाले की, भीमाशंकर कारखान्याने आर्थिक मदत करून बांधलेल्या गेटमुळे सहा बंधाऱ्यांमधील आठ गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देवदत्त निकम म्हणाले की, शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला असल्याने शासनाने सर्वच वीजबिल माफ करावे .
या भागातील शेतकऱ्यांचा ऊसतोडणी वाचून खराब होऊन चालला असल्याने काहीही करा, पण आमचा ऊस लवकर तोड करा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सुनीता गावडे यांनी करताच उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवत मागणीला पाठिंबा दिला.
कुकडी डाव्या कालव्यामधून कुकडी नदीत पाणी सोडण्यासाठी विमोचन दरवाजाचे उद्घाटन करताना राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व मान्यवर.