शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी, हेलपाट्यांमुळे नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:55 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुनर्वसनासाठी कोर्टाच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या गलथान कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच, शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने नैराश्य आल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ-सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेडच्या बॅकवॉटरवर असलेल्या रौंधळवाडी गावाच्या हद्दीत बबन सखाराम रौंधळ यांच्या घरासमोरील जलाशयात आत्महत्या केली. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्यासमोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दादही मागितली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुनर्वसन करा, असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेड प्रशासनाने त्यातील पात्र-अपात्रच्या फेºयात खातेदारांना घेतले आहे. वारंवार असंख्य हेलपाटे मारूनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळांनी जलसमाधी घेतली.गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजूर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंबसंख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते पुरते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र कुटुंबातील सदस्य संख्या २१होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते.