शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

छोट्या आकारातील अवैध बांधकामांना शास्तीतून सूट

By admin | Updated: January 10, 2017 03:28 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना सरसकट तिप्पट शास्ती कर लावला जात होता. शासनाच्या नवीन धोरणानुसार ५०० चौरस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना सरसकट तिप्पट शास्ती कर लावला जात होता. शासनाच्या नवीन धोरणानुसार ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्राच्या सदनिकांना शास्ती करातून सूट देण्यात आली आहे. मात्र, जादा क्षेत्रफळाच्या अनधिकृत बांधकामांनाच दुप्पट शास्ती भरावा लागणार आहे. नव्या धोरणामुळे शहरातील सुमारे दीड लाखाहून अधिक बांधकामांना याचा लाभ होणार आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनधिकृत बांधकामांना शास्ती शुल्क आकारण्याचे दर निश्चितीचे धोरण ठरविण्याचा अधिकार महापालिकांना आहे. यापूर्वी शास्तीचा निर्णय शासनस्तरावर घेतला जात होता; मात्र यापुढे संबंधित महापालिकांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे राज्य सरकारने सूचित केले असून बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार विविध टप्पे निश्चित करून शास्ती आकारणी केली जाणार आहे. शास्ती रद्दचा निर्णय झालेला नाही; परंतु महापालिकेने किती शास्ती वसूल करायची, याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाने केल्या आहेत. राज्य सरकारने मुंबई महापालिका अधिनियम कलम १५२ (अ ) आणि महाराष्ट्र महापलिका अधिनियमातीला कलम २६७ (अ)मध्ये सुधारणा केली आहे. तसा अध्यादेश काढला आहे. बांधकाम परवानगीन घेता केलेली बांधकामे, तसेच तरतुदींचे उल्लंघन करून झालेली बेकायदेशीर बांधकामे यांना मालमत्ता कराच्या दुप्पट शास्ती लावली जात होती. प्रत्येक वर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट शास्ती कराची रक्कम होती. त्याबाबत राज्य सरकारने कायदाच केलेला होता. त्यामुळे शास्ती कर भरणे कायद्याने बंधनकारक झाले होते. अवैध बांधकाम करून त्याची व्यवसायिक हेतूने विक्री करणारे बांधकाम व्यवसायिक शास्ती कर भरत नव्हते. त्याचा भुर्दंड सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सोसावा लागत होता. त्यामुळे व्यावसायिक उद्देशाने केलेल्या अनधिकृत बांधकामांना शास्तीची सवलत दिली जाणार नाही. शासनाने बांधकामाच्या क्षेत्रफळानुसार ठरवून दिलेल्या टप्प्यानुसार शास्ती आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने शास्ती कर आकारण्याच्या अधिकारातच बदल केले आहेत. अनधिकृत बांधकामांना मालमत्ता कराच्या दुप्पट शास्ती आकारण्याऐवजी ज्या महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात असे बांधकाम आहे, त्या संबंधित महापालिकेला शास्तीचा अधिकार दिला आहे. (प्रतिनिधी)