शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष, डाळिंबावर रोगांचे संकट

By admin | Updated: January 15, 2017 05:29 IST

गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी असून काही पिकांना या थंडीचा फायदा होत आहे, तर काही पिकांना मात्र ही थंडी बाधक ठरणार आहे. शनिवारी (दि. १४)

खोडद : गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात कडाक्याची थंडी असून काही पिकांना या थंडीचा फायदा होत आहे, तर काही पिकांना मात्र ही थंडी बाधक ठरणार आहे. शनिवारी (दि. १४) सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा असल्यामुळे या वातावरणाचा शेतीमालाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. जुन्नर तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे शेतीमालाची प्रत चांगली राहावी, म्हणून शेतकरी कीटकनाशके व बुरशीनाशके मोठ्या प्रमाणात वापरून फवारण्या करण्यात मग्न आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव आणि डाळिंबांची फुलगळ होण्याची भीती आहे.जुन्नर तालुक्यात सध्या ४ हजार एकर क्षेत्रांत द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षपिक घेतले आहे. जुन्नर तालुक्यातून सुमारे ४ ते ५ हजार टन द्राक्षे निर्यात होतात. द्राक्षांमध्ये ३ हजार एकर क्षेत्रांत जंबो शरद, फ्लेम या जातीची द्राक्षे आहेत. जंबो जातीच्या द्राक्षांना १५० रुपये प्रतिकिलोला बाजारभाव मिळत आहे. जंबोचे एकरी ५ ते ६ टन निर्यातक्षम उत्पादन निघते. फेब्रुवारी ते मार्च यादरम्यान निर्यातक्षम द्राक्षांची काढणी होते. निर्यातक्षम द्राक्षांना एकरी ४ लाख रुपये खर्च येतो, म्हणजेच ४० रुपये प्रतिकिलोला उत्पादन खर्च येतो. मात्र उत्पादन कमी प्रमणात निघाल्यास उत्पादनाच्या खर्चात प्रचंड वाढ होते. सध्या काही द्राक्षबागा रंग येण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही द्राक्षबागा फुगवणीच्या अवस्थेत आहेत. थंडी कडाक्याची असल्याने रंग येण्याच्या अवस्थेतील द्राक्षांना रंग येण्यास फायदा होत आहे, तर फुगवणीच्या अवस्थेतील द्राक्षांचा थंडीमुळे फुगवणीचा कालावधी लांबणीवर पडून या द्राक्षांची काढणी १५ ते २० दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या घडांना उन्हापासून संरक्षण व्हावे, म्हणून रद्दी पेपर गुंडाळले आहेत. मात्र सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.