शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तळेघर येथील पशुवैद्यकीय इमारतीची दुरवस्था

By admin | Updated: February 8, 2017 02:47 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अखेरची घटका मोजत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण खोऱ्यातील जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न सतत भेडसावत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी भीमाशंकर खोऱ्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी असणाऱ्या अशा तळेघर येथे श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना उभारण्यात आला. यामुळे भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळे, निगडाळे, राजपूर, तेरुंगण, तळेघर चिखली या गावांना या पशुवैद्यकीय दवाखान्याचा चांगलाच लाभ मिळाला. परंतु याच कित्येक वर्षे बांधलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत जुनी झाल्यामुळे ती आता अखेरची घटका मोजत आहे. या दवाखान्याच्या जुन्या झालेल्या खोल्या आता पडू लागल्या असून, काही खोल्यांचे दरवाजे, खिडक्याच गायब झाल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये तळेघर हे अत्यंत महत्त्वाचे व आदिवासी भागातील केंद्रबिंदूचे ठिकाण आहे. आदिवासी भागासाठी लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा येथे मिळतात. यामुळे तळेघर येथे असणाऱ्या श्रेणी १ च्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जनावरांची नेहमीच गर्दी असते; परंतु याच दवाखान्याची दुरवस्था झाल्यामुळे आदिवासी जनतेचे जनावरांच्या आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या इमारतीच्या दुरवस्थेमुळे या ठिकाणी या विभागाचा स्टाफ थांबत नाही. या दवाखान्याच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, जनावरांच्या उपचारासाठी लागणाऱ्या साहित्याचीही दुरवस्था आढळून आली. (वार्ताहर)