शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एड्सग्रस्तांविषयी भेदभाव हा कलंक

By admin | Updated: March 12, 2016 01:39 IST

एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणे आजही कलंक समजले जाते. सुशिक्षित समजानेही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सेवेने सामर्थ्य येते, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे

पुणे : एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणे आजही कलंक समजले जाते. सुशिक्षित समजानेही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. सेवेने सामर्थ्य येते, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे. याच विचाराने मी काम करत आहे. आपण सकारात्मक काम करत गेलो, की समाज आपोआप जुळत जातो, अशा भावना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी व्यक्त केल्या.चिंतन ग्रुपच्या सेवा प्रबोधिनी संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ. द. वि. निकम स्मृती पुरस्कार तिवसा (जि. अमरावती) येथील डॉ. वाडेकर यांना नागपूच्या वनराई फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात आला. त्या वेळी डॉ. वाडेकर बोलत होते. डॉ. वाडेकर यांच्या पत्नी विभा वाडेकर यांचाही या वेळी गौरव करण्यात आला. तसेच कॅन्सर या आजारावर मात करून यशस्वीरीत्या जीवन जगणाऱ्या शैलजा चौधरी यांना इंदुमती रानडे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख, लीलाताई निकम, प्रबोधिनीचे अध्यक्ष अभिनंदन थोरात, उपाध्यक्ष डॉ. दिलीप काकडे, सरचिटणीस संतोष डिंगणकर व्यासपीठावर होते. डॉ. वाडेकर म्हणाले, ‘‘देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करण्यास सुरुवात केली तेव्हा खूप त्रास झाला. ‘सेवेने अंगी सामर्थ्य येते, जे जे बोललो तेचि घडते’ या तुकडोजी महाराज यांच्या उक्तीप्रमाणे काम सुरू ठेवले. एड्सग्रस्तांसंदर्भातील भेदभाव दूर केला तरच हा आजार नष्ट होईल.’’ प्रास्ताविकात अभिनंदन थोरात यांनी संस्थेच्या कार्याविषयी आणि पुरस्काराविषयी माहिती दिली. मंदार थोरात, अश्विनी भुजबळ यांनी स्वागत केले. निबंध स्पर्धांचे परीक्षण करणाऱ्या अश्विनी घाटपांडे, कांचन थोरात, स्वाती थोरात आणि यशश्री नाईक यांचा सत्कार करण्यात आला. चिंतन थोरात यांनी सूत्रसंचालन केले.