शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘आपत्ती’जनक सुटी

By admin | Updated: August 26, 2014 04:51 IST

‘सुटी आहे, मदत करू शकणार नाही,’ अशी खुद्द उत्तरे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिक व नगरसेवकांनाही दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

पुणे : ‘सुटी आहे, मदत करू शकणार नाही,’ अशी खुद्द उत्तरे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिका-यांनी नागरिक व नगरसेवकांनाही दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुसळधार पावसानंतर सोसायट्यांत पाणी घुसले असताना जर मदत करू शकत नसतील, तर ही पथके काय कामाची, असा सवाल नगरसेवकांनी आज मुख्य सभेत केला. पावसाळ्यात शहरात पाणी घुसण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाकडून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज केली आहेत. मात्र, मुसळधार पाऊस होऊन सोसायट्यांमध्ये पाणी घुसले. त्याच दिवशी सुटी असल्याने या सर्व कामाचा भार अग्निशमन विभागावर आला.महापालिकेने शहरात ज्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी २४ तास मदतकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथके, मदतीसाठी आवश्यक साधन सामग्री सज्ज केली होती. शहरात शनिवार व रविवारी जोरदार पाऊस झाला. त्यातच महापालिकेस प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी, तसेच रविवारी सुटी असते. त्याचे कारण पुढे करीत या क्षेत्रीय कार्यालयांनी चक्क मदतीसच नकार दिल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)