शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

विनानुदानित शाळाही संचालकांच्या अखत्यारीत

By admin | Updated: January 10, 2017 03:33 IST

अनुदानित शाळांसह आता विनानुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने किंवा गुन्हा

पुणे : अनुदानित शाळांसह आता विनानुदानित शाळांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने किंवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबित, बडतर्फ आणि सेवेतून काढून टाकण्याचे अधिकार शिक्षण संचालकांना देण्यात आले आहे. यापूर्वी केवळ अनुदानित शाळांमधील शिक्षकांनाच निलंबनाचे अधिकार संचालकांना देण्यात आले होते. लाचलुचपत प्रकरणांमध्ये अटक किंवा गुन्हा नोंद होऊनही संबंधित शिक्षक, कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन, बडतर्फी, सेवेतून काढून टाकणे, अशी कारवाई संबंधित शिक्षण संस्थांकडून होत नसल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर १४ जुलैच्या शासन निर्णयामध्ये अनुदानित खासगी संस्थांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार शिक्षण संचालकांना देण्यात आला.  या वेळी खासगी शाळांना त्यातून वगळण्यात आले होते. त्याबाबत शासनस्तरावर हरकती घेण्यात आल्यानंतर शासनाने या शासन निर्णयात दुरुस्ती करून सोमवारी नवीन निर्णय घेतला. त्यानुसार आता अनुदानित शाळांप्रमाणेच विनानुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही संचालकांना देण्यात आले आहेत. लाचलुचपत प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या संचालकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचालकांनी घेतलेला निर्णय हा शाळा व्यवस्थापनाला तसेच संबंधित कर्मचाऱ्याला बंधनकारक असेल. शिक्षण संस्थांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संचालकांकडून निलंबन, बडतर्फी किंवा सेवेतून  काढून टाकण्याची कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)