शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

डॉक्टर साधणार रुग्णांशी थेट संवाद

By admin | Updated: October 19, 2015 02:05 IST

रुग्णालयातील डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेण्यासाठी इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या

पुणे : रुग्णालयातील डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांचे वाढते प्रमाण आणि त्यामागील कारणे यांचा आढावा घेण्यासाठी इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीनच्या (आयएससीसीएम) डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी सर्व रुग्णालयांतील अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर मीट युवर डॉक्टर या कार्यक्रमांतर्गत सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. या संवादाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व रुग्णालयांत टप्प्याटप्प्याने हा उपक्रम राबणार असल्याची माहिती डॉ. शिरीष प्रयाग यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. नुकत्याच पूना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉक्टरांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात सुसंवाद नसल्याने अशा प्रकारच्या घटनांना डॉक्टरांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टीचा केवळ निषेध नोंदवून थांबता येणार नाही. तर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कशा प्रकारे काम केले जाते, याबाबत माहिती मिळावी यासाठी थेट विशेष संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे डॉ. कपिल झिरपे यांनी सांगितले. अतिदक्षता विभागात रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टरांना कराव्या लागणाऱ्या कामांची अधिक सखोल माहिती मिळावी यासाठी लघुपट तयार केला आहे. त्याचेही प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच संवादासाठी मराठी ब्लॉग सुरू होणार आहे. डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होण्यासाठी पारदर्शकता येण्यासाठी हा उपक्रम लाभदायक ठरेल, असा विश्वास उपस्थित डॉक्टरांनी व्यक्त केला. या वेळी डॉ. बी. डी. बांडे व डॉ. अजित यादव व डॉ. शुभल दीक्षित उपस्थित होते.