शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

थेट कारवाईचे आयुक्तांचे आदेश

By admin | Updated: February 9, 2015 04:07 IST

पुणेकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई बडगा उचलण्याअगोदर त्यांना पळून जाण्यासाठी पुणे महापालिकेने तयार केलेले मार्ग

पुणे : पुणेकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई बडगा उचलण्याअगोदर त्यांना पळून जाण्यासाठी पुणे महापालिकेने तयार केलेले मार्ग आयुक्तांनी बंद केले. बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याअगोदर त्यासाठीचा विधी विभागाकडून सल्ला घेण्याचा अजब निर्णय पालिकेने घेतला होता. यामुळे बोगस डॉक्टरांना त्या काळात पळून जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पण नुकत्याच झालेल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीच्या बैठकीमध्ये बोगस डॉक्टरची तपासणी करण्यासाठी गेले असता त्यात तथ्य आढळल्यानंतर लगेचच कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत.बोगस डॉक्टरांना शोधण्यासाठी पुणे महापालिकेकडे प्रभावी यंत्रणा नसल्यामुळे शहरात त्यांची संख्या खूप वाढली आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसतानाही सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करीत औषधोपचार करणाऱ्या या बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी पालिकेमध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समिती स्थापण्यात आली. पालिकेचे आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीची ३ डिसेंबर २०१४ मध्ये बैठक झाली. या बैठकीस आयुक्त उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्तांनी ही बैठक घेतली होती. या बैठकीत शहरात बोगस डॉक्टर दिसून आल्यानंतर त्याची तपासणी करून आल्यानंतर त्याच्यावर थेट फौजदारी कारवाई न करता सर्व पुरावे गोळा करून ते पालिकेच्या विधी सल्लागारासमोर ठेवावेत आणि त्यांचा अभिप्राय घ्यावा. त्यानंतर समितीसमोर संबंधित प्रकरण ठेवावे आणि समितीने मान्यता दिल्यानंतर संबंधित बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे ठरविण्यात आले होते. या सर्व गोष्टी करण्यासाठी काही दिवस जावे लागत असल्याने संबंधित बोगस डॉक्टर पळून जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. ही बैठक झाल्यानंतर ५ बोगस डॉक्टर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शोधून काढले होते. त्यातील तिघांची सर्व माहिती घेऊन ती विधी सल्लागारांसमोर ठेवण्यात आली होती. त्यापैकी २ प्रकरणांचा अभिप्राय दिल्यानंतर ही प्रकरणे समितीसमोर ठेवण्यात आली होती. मात्र, समितीची बैठकच झाली नसल्यामुळे संबंधित बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई रखडली होती. अजूनही ही प्रकरणे प्रलंबितच आहेत. (प्रतिनिधी)