शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप वळसे पाटील यांचा षटकार

By admin | Updated: October 20, 2014 02:19 IST

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सलग सहाव्यांदा विजयी झाले असून, विजयाचा षटकार त्यांनी मारला आहे.

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील सलग सहाव्यांदा विजयी झाले असून, विजयाचा षटकार त्यांनी मारला आहे. वळसे पाटील यांनी शिवसेनेचे अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला. शिवसेनेचा दारुण पराभव झाला असून, भाजपा व काँग्रेस उमेदवारांना सन्मानजनक मतेही मिळविता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांनी सलग सहाव्यांदा विजय संपादन करून एक विक्रम केला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी चढत्या मताधिक्याने विजय मिळविला आहे. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांचा तब्बल ५८ हजार १५४ मतांनी पराभव केला आहे. वळसे पाटील यांना १ लाख २० हजार २३५ मते मिळाली, तर शिवसेनेचे अरुण गिरे यांना ६२ हजार ८१ मतांवर समाधान मानावे लागले. गिरे यांच्यापेक्षा वळसे पाटील यांनी दुपटीने मते मिळविली आहेत. भाजपा उमेदवार जयसिंग एरंडे यांना ४ हजार ६१५, तर काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. संध्या बाणखेले यांना केवळ २ हजार ४०८ मते मिळाली आहेत. आज सकाळी ६ वाजता येथील क्रीडा संकुलमध्ये मतमोजणीचा प्रारंभ झाला. एकावेळी २०० यंत्रांची मोजणी केली जात होती. पहिल्या फेरीपासून वळसे पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली व प्रत्येक फेरीत ती वाढतच गेली. पश्चिम अदिवासी पट्टा शिरूर तालुक्याची आंबेगावला जोडलेली ३९ गावे येथे वळसे पाटील यांनी सर्वाधिक मते घेतलीच; पण शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मंचर व परिसरातील गावांमध्ये वळसे पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. मंचर शहरात प्रथमच राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. काही मोजक्या गावांमध्ये शिवसेनेला किरकोळ स्वरूपाची आघाडी मिळाली असली तरी बहुतेक गावांमध्ये राष्ट्रवादीची आघाडी वाढतच गेली. उमेदवार गिरे यांच्या गावात वळसे पाटील यांनी मताधिक्य मिळविले आहे. शिवसेनेचा एकही गड शाबूत राहिला नाही. बारा वाजता मतमोजणी संपल्यानंतर वळसे पाटील मतमोजणी केंद्रावर आले तेव्हा कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत कल्याण पांढरे यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र वळसे पाटील यांना दिले. मतमोजणी केंद्रामध्ये राष्ट्रवादी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मताधिक्यात वाढ होताच एकमेकांना शुभेच्छा देत झाली का नाही अशी चर्चा ते करत होते. शिवसेनेचे कार्यकर्ते शेवटपर्यंत थांबले; पण निकाल स्पष्ट होताच त्यांनी निघून जाणे पसंत केले.