शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विठाबार्इंचे स्मारक वर्षभरात उभारणार : दिलीप कांबळे

By admin | Updated: April 16, 2015 23:06 IST

लोकनाट्य तमाशा सम्राज्ञी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी शासन पुढाकार घेईल.

नारायणगाव : लोकनाट्य तमाशा सम्राज्ञी आणि राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या स्मारकासाठी शासन पुढाकार घेईल. पुढील वर्षापर्यंत त्यांचे स्मारक उभारण्यात येईल. तसेच तमाशा कलावंत व त्यांची मुले यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.तमाशा सम्राट भाऊ बापू मांग व विठाबाई मांग नारायणगावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमप्रसंगी कांबळे यांनी धावती भेट देवून तमाशा कलावंतांच्या प्रश्नांची माहिती घेतली. या वेळी विठाबाई यांच्या मुलांनी तसेच येथील तमाशा पंढरीतील तमाशा फड मालकांनी कांबळे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.कांबळे यांनी सांगितले, की विठाबाईंच्या स्मारकांचा प्रश्न प्रलंबित आहे, स्मारकासाठी ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करुन द्यावी. वर्षभरात स्मारक उभारण्यात येईल, असे आश्वासन देऊ. स्मारकासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करुन देईन, वेळप्रसंगी केंद्र सरकारकडून निधी आणू; परंतु विठाबार्इंचे स्मारक होईलच, असे आश्वासन त्यांनी दिले. पेन्शन योजनेमध्ये भरीव अशी वाढ केली जाईल, तमाशा कलावंत हे भटकंतीवर असतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते, कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासन विशेष तरतूद करेल, त्यांच्या जातीच्या दाखल्यासाठी जाचक अटी शिथिल करुन त्यांना दाखले कसे मिळतील याकडे जातीने लक्ष दिले जाईल, कलावंतांच्या मनधन, पॅकेज यासाठी शासन लक्ष देऊन प्रश्न मार्गी लावेल, असे आश्वासन कांबळे यांनी दिले. या वेळी येथील मुक्ताबाई देवस्थान इस्टचे अध्यक्ष एकनाथ शेटे व तमाशा पंढरीच्या वतीने विठाबाई यांच्या मुलांनी दिलीप कांबळे यांचा सत्कार केला. बसस्थानकासमोरील विठाबाई नारायणगावकर यांच्या पुतळ्याला कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला.