शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दिघीच्या प्रतिबंधित क्षेत्रात मुक्त वावर

By admin | Updated: April 24, 2017 05:19 IST

येथील मॅगझिन चौकात असलेल्या संरक्षण विभागाच्या मॅगझिन डेपो (दारूगोळा कोठार) व दिघी डोंगराजवळील दारूगोळा

दिघी : येथील मॅगझिन चौकात असलेल्या संरक्षण विभागाच्या मॅगझिन डेपो (दारूगोळा कोठार) व दिघी डोंगराजवळील दारूगोळा चाचणीचा मोकळा परिसर नागरीकांसाठी संरक्षण विभागाने प्रतिबंधित केला आहे. मात्र मागील काही दिवसात दिघी डोंगरानजीक सापडलेले सात जिवंत बॉम्ब सदृश वस्तू यामुळे सामान्य नागरीकांसह संरक्षण विभागाच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता समोर आला आहे. खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत बनलेल्या दारूगोळ्याची चाचणी परिक्षा दिघी डोंगरालगत असलेल्या मैदानात घेतली जाते. चाचणीच्यावेळी सर्व परिसर मोकळा करून निर्मनुष्य केला जातो. तसेच जवळचं या परिसरात असलेल्या दारूगोळा कोठाराच्या सुरक्षेबाबतची काळजी घेऊन हा परिसर प्रतिबंधित क्षेञ घोषित करण्यात आले आहे. त्याकरीता संरक्षण विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात संरक्षक सिमा भिंती सुध्दा बांधलेल्या आहेत. मात्र या बांधलेल्या सिमा भिंतीलाच प्रतिबंधित क्षेञात प्रवेश करण्यासाठी अनेक वाटा निर्माण झाल्या आहेत. ह्या निर्माण झालेल्या वाटा नागरीकांनी केल्या की संरक्षण विभागाने सोडल्या आहेत हे मात्र अनुत्तरीत असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण विभागाने दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्रात आता सामान्य नागरीकांचा होणारा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. याच दिघी डोंगराच्या पायवाटेच्या वाटेने धानोरी गावाकडे जाण्याची वाट आहे. विश्रांतवाडी मार्गे धानोरी गावात जाण्याचा सरळ मार्ग असतांना अनेक पायी व दोन चाकी वाहनधारक या प्रतिबंधित क्षेत्रामधून धानोरीचा मार्ग वापरत आहेत. नुकतेचं दोन दिवसांपूर्वी झालेल्या दारूगोळा चाचणी परिक्षेच्या वेळी संरक्षण विभागाने सिमाभिंतीच्या सर्व वाटेवर खोल खड्डे खोदून नागरीकांची वहिवाट बंद केली आहे. (वार्ताहर)