उपवनसंरक्षक जयरामे गौडा व सहायक वनसंरक्षक अमित भिसे यांनी हा गाडलेला पायरीमार्ग मोकळा करण्याची संकल्पना मांडली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी ही संकल्पना वनपाल व वनरक्षकाच्या माध्यमातून श्रमदानातून किल्ले संवर्धन हा उपक्रम समाजासमोर ठेवला. जवळपास ८ ट्रक माती या पायरीमार्गावरून हटविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, वनपाल शशिकांत मडके, मारुती फुलसुंदर, वनरक्षक रमेश खरमाळे, नीलेश विरणक, दशरथ डोके, नारायण राठोड, संजय गायकवाड, आदर्श जगताप, वैभव वाजे, रामेश्वर फुलवाड, सचिन कवटे, विश्वनाथ बेले, वनरक्षक भाग्यश्री टोणपे, तेजस्विनी भालेकर, वनिता वडेकर तसेच ग्रामस्थ दत्तू कोकणे सहभागी झाले होते.
या पायरी मार्गावर आवश्यक तेथे रेलिंग तसेच दुरुस्ती करण्यात येईल. दुर्गप्रेमी पर्यटकांची वर्दळ वाढल्याने पर्यटनवाढीसाठी पण मदत होऊन रोजगाराच्या संधी येथे निर्माण होतील, असे मत वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी व्यक्त केले.
२५ जुन्नर किल्ला
किल्ले निमगिरीचा गाडलेला अवघड पायरीमार्ग श्रमदानातून मोकळा करताना वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी.