शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आगळीवेगळी श्रद्धांजली : जिवाभावाच्या दोस्ताचे घर पूर्ण करून पुण्यस्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 03:49 IST

जिवाभावाचा दोस्त नीलेश अपघातात गमवला. शर्थीचे प्रयत्न करूनही आपण नील्याला वाचवू शकलो नाही, याची खंत प्रत्येकालाच होती.

बारामती : जिवाभावाचा दोस्त नीलेश अपघातात गमवला. शर्थीचे प्रयत्न करूनही आपण नील्याला वाचवू शकलो नाही, याची खंत प्रत्येकालाच होती. त्याच्यासाठी काहीतरी करायला हवे, या जाणिवेतून ‘स्वत:चे घर बांधण्याचे त्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करायचे,’ असे ठरवून प्रत्येक जण कामाला लागला. आज नीलेशचे प्रथम पुण्यस्मरण. याच दिवशी सर्व दोस्त मंडळींनी त्याच्या घराचे बांधकाम पूर्ण करून आपल्या जिवलग दोस्ताला आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.नीलेश सोलापूर जिल्ह्यातील कळंबोली (ता. माळशिरस) येथील रहिवासी. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कळंब (ता. इंदापूर) येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात झाले. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. मागील वर्षी लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यास गेलेल्या नीलेश शामराव खरात अपघातात गंभीर जखमी झाला. त्यामुळे तो कोमात गेला. आई-वडील आणि भाऊ शेतमजूर म्हणून राबतात. नीलेशच्या उपचारांचा खर्च मोठा होता. अशा वेळी कळंब महाविद्यालयाच्या त्याच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेत व्हॉट्सअ‍ॅपवर ‘एक हात मदती’चा अशी मोहीम उघडली. सर्वांनी आपापल्या परीने नीलेशच्या उपचारासाठी रक्कम जमवली. मात्र त्याची झुंज अपयशी ठरली.‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाऱ्या आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते. मित्रांनी उपचारासाठी जमवलेले पैशातून त्याचे अपूर्ण राहिलेले घराचे स्वप्न पूर्ण करायचे ठरविले होते. तसेच अजून पैसे लागले तर जमवायचे, असे त्याच्या मित्रांनी ठरवले. प्रत्येकाने नीलेशचे घर पूर्ण करण्याची जबाबदारी उचलली.त्याच्या प्रथम पुण्यस्मरणदिनीच त्याच्या वर्गमित्रांनी नीलेशच्याघराचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकालाच आहे. फक्त हे घर पाहायलाआज नीलेश आपल्यात नाही, या भावनेनेच सर्वांच्या डोळ््याच्या कडा पाणावतात.नीलेशने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षण घेतले होते. नोकरीसाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. वालचंदनगरपरिसरासत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतल्या. याचदरम्यान देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराममहाराज विद्यालयात तो विनाअनुदानित तत्त्वावर नोकरीस लागला होता. वेतन बेताचेच असले तरी‘संपूर्ण आयुष्य मातीच्या पडक्या घरात काढणाºया आपल्या आई-वडिलांसाठी लहानसे का होईना चांगले घर बांधायचे,’ असे नीलेशचे स्वप्न होते.