शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीचा अन‌् समांतर वाहतुकीचा एसटीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:08 IST

पुणे : डिझेल दरवाढीचा अन‌् समांतर वाहतुकीचा एसटीला आर्थिक फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाला रोजचा जवळपास १४ कोटींचा ...

पुणे : डिझेल दरवाढीचा अन‌् समांतर वाहतुकीचा एसटीला आर्थिक फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाला रोजचा जवळपास १४ कोटींचा फटका बसत आहे. त्यामुळे एसटीला दररोज लागणारे डिझेल पूर्ण क्षमतेने खरेदी करू शकत नाही. परिणामी काही गाड्या रद्द कराव्या लागत आहे. यातच विविध डेपोच्या गाड्या एकाच मार्गावर धावत असल्याने समांतर वाहतूक होत आहे. त्यामुळे प्रवासाची विभागणी होत आहे. काही गाड्यांवर ४ ते ५ प्रवासी घेऊन वाहतूक सुरू आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सध्या १० हजार गाड्या धावत आहे. यातून कसेबसे ८ कोटी रुपयांचे दररोजचे उत्पन्न मिळत आहे. प्रवासीसंख्या कमी असल्याने एसटीचे उत्पन्न कमी होत आहे. यातच सतत वाढत जाणारे डिझेलचे दर, कमी उत्पन्न त्यामुळे एसटी प्रशासन कमी प्रमाणात डिझेलची खरेदी करीत आहे. डिझेलअभावी महत्त्वाचे मार्ग वगळता कमी प्रतिसाद असलेल्या मार्गावर वाहतूक बंद आहे.

-------------------

डिझेलअभावी काही वेळा गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मात्र असे फार कमी वेळा घडले आहे. पुणे विभागात समांतर वाहतूकची समस्या नाही.

ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे.

-------------------------

प्रवासीसंख्या कमी असल्याने एसटीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातच राज्यात अनेक विभागांत समांतर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे एसटीची स्पर्धा एसटीशी असे चित्र निर्माण होत आहे. हे तत्काळ थांबले पाहिजे. वाहतूक अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

-श्रीरंग बर्गे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस