शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील झोपेत असताना बोलले की जागे असताना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक लोकमत ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्कील सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टीका : बारामती येथे कोरोना आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील यांना असह्य झाले आहे. आपल्या जागा जास्त आल्या, तरी आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही याची बोचणी त्यांना लागून आहे. या मानसिकतेतून ते बाहेर यायला तयार नाहीत. महाराष्ट्र झोपेत असताना हे सरकार पडेल असे विधान त्यांनी झोपेत असतानाच केले की जागे असताना केले, असा मिश्कील सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केला.

बारामती येथे शनिवार (दि. २९) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. पवार म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ते आपल्या निर्णयाशी ठाम आहेत, तोपर्यंत या सरकारला कसलाही धोका नाही. मराठा आरक्षणाबाबत इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लागता खबरदारी राज्य सरकार घेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे. ते मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करत आहेत. राज्य सरकार सर्वच जाती-धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे. कोरोनाकाळात शेतीव्यवसायाने देशाचा जीडीपी टिकवला आहे. खरिपाच्या अनुषंगाने शेतीउपयोगी औषधे, अवजारे व खतांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

चौकट

परदेशातील लसींना परवानगी द्यावी : अजित पवार

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जेवढ्या अडचणी आल्या त्या अडचणी येऊ नयेत, यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परदेशातील लसींना तातडीने परवानगी देण्यात यावी, तसेच या लसी मिळवण्यासाठी केंद्राने प्रयत्न केले तर लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याचा प्रस्ताव आला आहे. ज्या त्या भागातील रुग्णांनी आपापल्या भागात उपचार घेतल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही. मात्र, कोणत्याही भागातील रुग्ण कोठेही उपचार घेऊ शकतात. तो रुग्णाचा अधिकार आहे. त्यामुळे या साथरोगावर दर्जेदार उपचार देण्यासाठी आरोग्य विभाग व शासन सकारात्मक आहे, असेही या वेळी पवार म्हणाले.

---------------------------