शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डायलिसीसच्या रुग्णाला डायबिटीसचे औषध

By admin | Updated: September 3, 2016 03:19 IST

मूत्रपिंडचा त्रास असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला उपचारांदरम्यान भलत्याच रुग्णाचे डायबिटीसचे औषध देण्यात आल्याचा प्रकार बुधराणी रुग्णालयात घडला. यामध्ये रेल्वे अधिकाऱ्याचा

पुणे : मूत्रपिंडचा त्रास असलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला उपचारांदरम्यान भलत्याच रुग्णाचे डायबिटीसचे औषध देण्यात आल्याचा प्रकार बुधराणी रुग्णालयात घडला. यामध्ये रेल्वे अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून, कोरेगाव पार्क पोलिसांनी रुग्णालयाचा व्यवस्थापक, डॉक्टर आणि दोन परिचारिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत दिनकर वाळके (वय ५४) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधराणी रुग्णालयाच्या व्यवस्थापकासह डॉक्टर सचिन पाटील, परिचारिका शारदा डुंबरे, माधवी चक्रनारायण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्योती चंद्रकांत वाळके (वय २३, रा. फ्लेमिंगा अपार्टमेंट, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळके रेल्वेमध्ये अधिकारी आहेत. त्यांना मूत्रपिंड आणि डायलिसीसचा त्रास होता. त्यामुळे काही वर्षांपासून ते बुधराणी रुग्णालयात उपचार घेत होते. २७ जुलैपासून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले, त्या वेळी औषधे लिहून दिली. (प्रतिनिधी)डॉक्टरांना दाखवून घेतली होती औषधेघरी घेण्यासाठी काही औषधांची यादी देऊन मेडिकलमधून ही औषधे आणण्यास सांगण्यात आले. वाळके कुटुंबीयांनी ही औषधे आणल्यावर ती डॉक्टर सचिन पाटील यांना दाखविली. औषधे योग्य असल्याचे पाटील यांनी सांगितल्यावर वाळके यांना घरी गेल्यावर ही औषधे देण्यात आली. औषधांचे सेवन केल्यावर बेशुद्ध पडलेल्या वाळकेंना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. कुटुंबीयांनी रुग्णालयात चौकशी केल्यावर चंद्रप्रकाश लोखंडे या डायबिटीसच्या रुग्णाची औषधे वाळके यांना देण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हा प्रकार खरा असल्याचे समोर आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक जगन्नाथ मोरे पुढील तपास करीत आहेत.