शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक जनजागृतीसाठी ढोल-ताशा वादक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:37 IST

‘गणपती बाप्पा मोरया, वाहतूक नियमांचे पालन करू या... लाल रंग दिसल्यावर बैल उधळतात, माणसं नाही, तेव्हा सिग्नल तोडू नका...’ अशा घोषणा देत पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तरुणाईने रस्ता सुरक्षा अभियान राबविले.

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, वाहतूक नियमांचे पालन करू या... लाल रंग दिसल्यावर बैल उधळतात, माणसं नाही, तेव्हा सिग्नल तोडू नका...’ अशा घोषणा देत पुण्यातील ढोल-ताशा पथकातील तरुणाईने रस्ता सुरक्षा अभियान राबविले. सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधून जनजागृती करण्यासाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची कन्या वंदना ढवळे आणि महापौर मुक्ता टिळक याही युवा वादकांच्या फौजेसोबत रस्त्यावर उतरल्या.ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात या रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ तेंडुलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. या वेळी अ‍ॅड. प्रताप परदेशी, आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, इक्बाल दरबार, प्रणव पवार, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतुकीचे नियम पाळू, अशी शपथ या वेळी वादकांनी घेतली.वंदना ढवळे म्हणाल्या, ‘गाडी चालवताना हातातले किंवा पायातले ब्रेक वापरण्याऐवजी डोक्यातील ब्रेक अवश्य वापरायला हवे, असे बाबा नेहमी म्हणत. त्यामुळे आज ढोल-ताशा वादकांनी हा पाच दिवसांचा उपक्रम राबवून बाबांना वेगळ्या प्रकारे आदरांजली अर्पण केली आहे. बाबांनी सुरू केलेल्या वाहतूक जनजागृतीचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’पराग ठाकूर म्हणाले, की ढोल-ताशा महासंघातर्फे पुण्यातील तब्बल ८० पथके या अभियानात सहभागी झाली आहेत. यामध्ये शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या ८० चौकांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक जनजागृती करण्यात येईल. यामध्ये जनजागृतीपर फलकांसह सुरक्षा राखी बांधूनवाहन चालकांना माहितीपर पत्रके देण्यात येणार आहेत. पुण्यातील तब्बल ५ हजार युवा ढोल-ताशा वादक या अभियानात सहभागीहोणार असून, हीच तेंडुलकर यांनाखरी आदरांजली असेल, असेहीते म्हणाले.