शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा धोबी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेली २७ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा व न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेली २७ वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा व न्यायालयाने फरार घोषित केलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विराेधी पथकाने मुंबईच्या कांदिवली परिसरातून अटक केली. मुळच्या उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने २७ वर्षापूर्वी किष्कंदानगर येथील एका तरुणीला पळवून नेऊन लग्न केले होते. आपल्या मुलीला पळवून नेले असल्याची फिर्याद तिच्या आईवडिलांनी दिली होती. काही दिवसांनी मुलगी परत आली. तेव्हा मुलीच्या अपहरणाची तक्रार १९९३ मध्ये कोथरुड पोलिसांकडे देण्यात आली होती. पुढे आईवडिलांच्या परवानगीने या तरुणाने त्या मुलीशी लग्न केले होते. मात्र, ही गोष्ट पोलिसांपर्यंत आलीच नाही. पोलिसांच्या लेखी हा तरुण फरारी होता. न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले होते.

दरम्यान गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी धनंजय ताजणे व मॅगी जाधव यांना धोबी हा ओम साईनाथ चाळ कांदीवली वेस्ट मुंबई येथील परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून धोबीला ताब्यात घेतले. तो मुंबईत खासगी सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, सहायक फौजदार शाहीद शेख, कर्मचारी राहुल निगडे, गणेश पाटोळे यांच्या पथकाने केली. आता तो ५० वर्षाचा असून त्याला मुलेही झाली. त्यांची लग्ने होऊन तो आता आजोबाही झाला आहे. दरोडा व वाहनचोरी पथकाने त्याला कोथरुड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याची चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. मात्र, हा गुन्हा अद्यापही प्रलंबित असल्याने पोलिसांनी त्याला अटक करुन आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.