शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

हिंदूंच्या संघटनासाठी धर्मजागृती सभा -पराग गोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:47 IST

हिंदू संस्कृतीवर आक्रमण होत आहे. दहशतवाद वाढला असून, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाने येथील परंपरांना छेद देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा परिस्थितीत हिंदू परंपरा आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. परंपरा आणि संस्कृती याची सांगड घालत हिंदूराष्टÑ निर्मितीच्या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या माध्यमातून धर्मसभांचे आयोजन केले जाते. धर्मसभांच्या आयोजनामागील हा उद्देश समितीचे समन्वयक पराग गोखले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

हिंदूंचे संघटन हा उद्देश ठेवून हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी संस्थांच्या माध्यमातून हिंदू धर्मजागृती सभा घेण्यात येतात. जातिभेदाच्या पलीकडे हिंदू म्हणून सर्वांना एकत्र आणण्याचे मोलाचे काम धर्मजागृती सभांच्या माध्यमातून होते. गेल्या १० वर्षांत देशाच्या विविध भागांत १५००हून अधिक धर्मसभा घेण्यात आल्या. पुण्यात शंभरहून अधिक धर्मसभा झाल्या असून, त्यामुळे व्यापक जनजागृतीचा उद्देश सफल झाला आहे.परंपरा आणि संस्कृतीला भारतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संस्कृतीवर आक्रमण होत आहे. संस्कृतीहननाच्या घटना वारंवार घडत आहेत. हिंसाचार, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच सांंस्कृतिक दहशतवाद वाढू लागला आहे. हिंदुत्वावर हे आघात होत आहेत. धर्मशिक्षणाचा अभाव असल्यानेच हिंदूंचे खच्चीकरण होत आहे.जात-पात, पक्ष, संप्रदाय याचा अभिनिवेश बाजूला ठेवून हिंदूंचे संघटन करणे, त्यांच्यामध्ये धर्मजागृती करणे या उद्देशाने आयोजित केल्या जाणाºया धर्मसभांना नागरिकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. समाजातील विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात आहे. इतिहासाची मोडतोड, राष्टÑपुरुषांचे विकृतीकरण केले जात आहे. त्यासाठी अलीकडच्या काळात चित्रपट या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. वेद, उपनिषदे यांबद्दल विखारी प्रचार करणारी यंत्रणा या देशात काहींनी कार्यान्वित केली आहे. अशा वेळी समाजापुढे, नव्या पिढीपुढे आदर्श काय ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.धर्मजागृती सभांमध्ये देवघराची मांडणी कशी असावी, धर्मशास्त्रानुसार नैवेद्य कसा करावा, पारंपरिकविधी कसे करावेत, या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलेजाते. धर्मसभांमध्ये आध्यात्मिक विषयावरील ग्रंथ उपलब्ध करूनदिले जातात. धर्मसभेच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपातील ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. एवढेच नव्हे, तर क्रांतिकारकांचे चित्रप्रदर्शन भरविण्यात येते. काश्मिरी विस्थापित हिंदू आणि बांगलादेशातील हिंदूंची स्थिती, या विषयी छायाचित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असते. धर्मजागृती सभांचे हे खास वैशिष्ट्य असते. सभेत केवळ हिंदू संस्कृती आणि परंपरांविषयीचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन एवढाच हेतू नसतो, तर देशाभिमान आणि राष्टÑाप्रति आपुलकीची भावना रुजविण्याचे काम या धर्मजागृती सभांमधून केले जाते, हे आवर्जून नमूद करावे वाटते.पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण होईल, असे कार्यक्रम आपल्या येथे आयोजित केले जात आहेत.या कार्यक्रमांच्या माध्यमातून नवतरुणांना व्यसनाधीनतेकडे ओढले जात आहे. गोव्यात असाच पाश्चात्त्य धर्तीवरील तरुणाईला आकर्षित करणारा एक फेस्टिव्हल झाला. त्यात अनेक तरुण-तरुणी सहभागी झाल्या होत्या. अंमली पदार्थ विक्री करणाºया एका बड्या व्यापाºयाचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही शासकीय परवानगी न घेता, राजरोसपणे असे कार्यक्रम घेतले गेले. सुमारे दोन कोटींचा शासनाचा कर बुडविल्याचे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने आयोजकांना शासकीय कर भरण्याचा आदेश दिला. आयोजकांनी गोव्यानंतर पाश्चात्त्यांच्या धर्तीवरील कार्यक्रम घेण्यासाठी पुणे हे ठिकाण निवडले. त्याला कडाडून विरोध झाला असतानाही कार्यक्रम झाला.यंदाही असा कार्यक्रम पुण्यातच आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, सभेच्या माध्यमातून त्यास कडाडून विरोध करण्यात आला. हिंदू संस्कृतीवरील आक्रमण, आघात थोपविण्यासाठी नागरिकांमध्ये धर्मजागृती असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यापक जनजागृतीला अधिक महत्त्व दिले गेले आहे.महाराष्टÑ, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आदी ठिकाणी वेळोवेळी धर्मसभा घेऊन प्रबोधनाचे काम समितीने केले आहे.

टॅग्स :Hinduismहिंदुइझम