भोर : कालपासुन झालेल्या मुसळधार पावसामुळे धानवली (ता. भोर) गावातील घरांजवळ डोंगरातील मोठमोठ्या दरडी वाहुन आल्या आहेत. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या ठिकाणी माळीण सारखी परिस्थिती होऊ शकते. धानवली रस्त्यावरील पुल वाहुन गेला असुन गावाजवळच्या ओढयाला पुर आल्याने संपुर्ण गावाचा संर्पक तुटलेला आहे. यामुळे गावात भितीचे वातावरण असुन धानवली गावाचे इतर ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.
भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील रायरेश्वर किल्याच्या पायथ्याशी डोंगरकपारीत वरची धानवली येथे २० ते २५ कुटुंबे राहतात. ना रस्ता ना पाणी ना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातील दरडी पडल्याने घरांना व लोकांना धोका निर्माण झालेला आहे. खालच्या धानवलीत ४० ते ५० कुटुंबे राहात असुन कालच्या पावसामुळे मोठमोठे दगडगोटे घरांजवळ येऊन थांबले आहेत. यामुळे भात, नाचणीची शेती भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळयात गावात भितीचे वातावरण तयार होते. याबाबत वारवार शासनाकडे मागणी करुनही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी धानवलीच्या उपसरपंच उषा रामचंद्र धानवले व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. कंकवाडी ते धानवली या अडीच किलोमीटर रस्त्यावरील तीन ठिकाणचे पुल पाण्याच्या प्रवाहामुळे वाहुन गेले आहे. धानवली गावाजवळ असलेल्या मोठ्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने गावाचा संर्पक तुटलेला आहे. दरम्यान तहसिलदार अजित पाटील, मंडलअधिकारी लहारे तलाठी यांनी धानवली गावाला भेट दिली. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना गावात जाता आले नाही. येथील नागरीकांना प्रशासनासह इतर लोकांनी मदत करण्याचे आवाहन तहसिलदार आजित पाटील यांनी केले आहे.
चौकट
धोकादायक गाव असुनही गावाचे पुर्नवसन नाही
रायरेश्वर किल्याच्या खाली असलेले धानवली गाव शासनाने धोकादायक म्हणून जाहिर केलेले आहे. त्यासाठी गावात संरक्षक भिंत घालण्यासाठी मागिल दोन वर्षापासुन निधी मंजूर आहे. मात्र. संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. काल पासुन पडत असलेल्या मुसळधार पावसाने घरांजवळ दरडी पडल्याने गावाचा धोका अधिकच वाढला आहे. गावात भितीचे वातावरण
आहे. यामुळे धानवली गावातील नागरीकांचे सुरक्षित ठिकाणी पुर्नवसन करण्याची मागणी नागरीक करित आहेत.
फोटो आहे :