शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

धानेपच्या धरणग्रस्तांवर पाच दिवसांनी गुन्हा दाखल

By admin | Updated: April 24, 2015 03:31 IST

धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांनी धानेप ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी चार जणांवर वेल्हे पोलिसांनी

मार्गासनी : धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांनी धानेप ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवल्याप्रकरणी तब्बल पाच दिवसांनी चार जणांवर वेल्हे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात धरणग्रस्त समितीमधील कार्यकर्ते सागर सुरेश मळेकर, शिवाजी तानाजी रेणुसे, ज्ञानेश्वर जानू ओव्हाळ व मारुती दामू चोर (चौघेही राहणार धानेप, ता. वेल्हे) यांच्यावर अधिकाऱ्यांना कोंडून ठेवून, शासकीय कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.या संदर्भात अधिक माहिती अशी, वेल्हे येथील चापेट धरणाचे काम पुन्हा चालू करण्यासाठी शासनपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. बुडीत क्षेत्रात येत असलेल्या कोदापूर, कानंद व भोसलेवाडी या गावांचे गावठाण पुनर्वसन धानेप गावामध्ये होत आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. याला धानेप गावामधील धरणग्रस्तांचा विरोध आहे. अद्याप पुनर्वसन झाले नाही तसेच धानेप गावामधील संपादित क्षेत्र हे बुडीत खाणीसाठी संपादित झाले आहे. ते पुनर्वसनासाठी घेऊ नये, तीन गावांचे गावठाण पुनर्वसन या ठिकाणी होऊ नये, धानेपमधील धरणग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने व्हावे, या त्यांच्या मागण्या आहेत. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनावर चर्चा करण्यासाठी नीरा देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता बी. आर. पवार, व्ही. डी. नलावडे, भरत वायसे हे १८ एप्रिल रोजी धानेप येथे आले होते. त्यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या वेळी धरणग्रस्तांनी व ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. आमच्या मागण्यांबाबत मंत्रालयात किंवा मुंबईत बैठक न घेता येथे वेल्ह्यात बैठक घेण्यात यावी, आमच्या मागण्या जिल्हाधिकारी व संबधित अधिकाऱ्यांना पोचवण्याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. जोपर्यंत लेखी हमी देत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना कोंडण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी लेखी हमी दिल्यावर त्यांना सोडण्यात आले होते. या घटनेनंतर पाच दिवसांनी अभियंता पवार यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद घुगे व सहकारी पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)