शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

धनकवडी पोलीस चौकी नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:12 IST

शहरात पोलीस चौकीला जागा मागूनदेखील मिळत नाहीत किंवा जागेअभावी दहा बाय दहाच्या रूममध्ये कोणतीही सुविधा नसलेल्या पोलीस चौक्या आहेत,

धनकवडी : शहरात पोलीस चौकीला जागा मागूनदेखील मिळत नाहीत किंवा जागेअभावी दहा बाय दहाच्या रूममध्ये कोणतीही सुविधा नसलेल्या पोलीस चौक्या आहेत, याचीच उलट परिस्थिती धनकवडी येथे शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन येथे धनकवडी पोलीस चौकीसाठी फर्निचरसह अद्ययावत असे सर्व काही तयार आहे, तसेच यासंबंधी १७ जुलै रोजी पोलीस चौकी स्थलांतरित करावी, अशी मागणीचे पत्र पोलीस आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस ठाणे यांना दिले असूनदेखील ताबा घेण्यासाठी कोणाचाही फोन अथवा विचारणा झाली नसल्याने या जागेची गरज पोलिसांना आहेकिंवा नाही, असा प्रश्न स्थानिक नगरसेवक विशाल तांबे यांना पडला आहे.धनकवडीची सध्याची पोलीस चौकीची जागा भाडेतत्त्वावर असून या ठिकाणी अद्ययावत बिल्डिंगसह फर्निचरपण नाही.नवीन बांधण्यात आलेली चौकी शिवाजी आहेर या मुख्य रस्त्यावरील चौकात मध्यवर्ती ठिकाणीअसल्याने त्याचा फायदासर्वसामान्य नागरिकांना होणार असून त्याची दखल मात्र पोलीस घेत नाहीत.तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना या जागेत पोलीस चौकीसाठी जागा देण्यासाठी आवाहन केले होते. याच शब्दाला जागून ही फर्निचरसह जागा उपलब्ध करून दिली आहे.या जागेची गरज नसेल तर शहर पोलीस विभागाने तसे पत्र महापालिका किंवा स्थानिक नगरसेवकांना दिल्यास नागरिकांच्या गरजेच्या दृष्टीने अन्य सोईसुविधा किंवा अन्य विभागाला वर्ग करता येईल, असे स्थानिक नगरसेवक व स्थायी समितीचे माजीअध्यक्ष विशाल तांबे यांनीसांगितले.