शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाच्यावतीने बंद पाळण्यात येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:37 IST

अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सध्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र बंदची काही संघटनांनी हाक दिली होती.

बारामती -अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सध्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र बंदची काही संघटनांनी हाक दिली होती. याबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर बारामती येथे धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सोमवारी धनगर समाजाच्यावतीने कोणताही बंद पाळण्यात येणार नसल्याची घोषणा करण्यात आली.याबाबत धनगर प्रबोधन संघाचे अध्यक्ष गोविंद देवकाते यांनी माहिती दिली. अधिक माहिती देताना देवकाते म्हणाले, की महाराष्ट्र बंदची हाक काही संघटनांनी दिली होती. बारामतीतदेखील बंद होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे नागरिक, व्यापाºयांमध्ये संभ्रम होता. मात्र, बारामतीत कोणत्याही नेतेमंडळींनी, आरक्षण कृती समितीने बंद पुकारला नव्हता. त्यामुळे समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. पोलीस ठाण्यातदेखील बैठक पार पडली. त्यामध्ये बंद पाळायचा नाही, यावर निर्णय झाला आहे.मराठा आरक्षण आंदोलन, सरकारी कर्मचारी आंदोलन, दूधदरवाढ आंदोलन येणाºया सणासुदीच्या दिवसामध्ये सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक भावनेतून बारामतीतील धनगर समाजातील नेतेमंडळींनी हा बंद पाळायचा नाही, असा निर्णय घेतला.यावेळी बैठकीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, बाळासाहेब कोळेकर, बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. जी. बी. गावडे,किशोर मासाळ, गुलाबरावगावडे, नीलेश धालपे,अभिजित देवकाते, नितीन देवकाते, नवनाथ मलगुंडे, पंकज देवकाते आदी उपस्थित होते.

टॅग्स :newsबातम्या