शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘देवपाल’मुळे पाणीप्रश्न सुटेल

By admin | Updated: October 11, 2014 06:56 IST

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे

भोर : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ७ गावांतील सुमारे ४५० ते ५०० एकर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येऊन गावातील पाणीटंचाई दूर होणार आहे. या लघुपाटबंधारे तलावामुळे बाधित होणाऱ्या जमिनींचा मोबदला व शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून, भरपाई दिली जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.आमदार थोपटे यांनी वेल्हे तालुक्यातील वाजेघर, लव्ही आवळी, दादवडी, मेरावणे, फणशी, साखर, घावर, चिरमोडी, सुरवड, भागिनघर, मंजाईआसनी, दामगुडाअसनी, कोदवडी, वडगावझांजे सोडे या गावांत प्रचार दौरा केला. या वेळी ते देवपाल येथे बोलत होते.या वेळी सभापती सविता वाडघरे, दिलीप लोहकरे, चंद्रकांत शेडकर, सुषमा रेणुसे, वसुधा नलावडे, शोभा जाधव,गणपतराव रेणुसे, भाऊ दसवडकर, बाळासो शिळीमकर, माऊली खाटपे, शिवाजी येनपुरे, काळुराम पिलावरे, मोहन शिळीमकर, शिवाजी चहाटे, संतोष भोसले, सूर्यकांत भोसले, उत्तम रेणुसे, विलास रांजणे, बाळू भरम, भगवान शिदे, आण्णासो रांजणे उपस्थित होते. थोपटे म्हणाले, की सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधाऱ्यामुळे ५० दशलक्ष घन मीटर पाणी साचणार आहे. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे. त्याचा मोबदला लवकरच मिळेल. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर डोंगरावर बंद पाइपने पाणी नेऊन सायफन पद्धतीने पाणी आणून शेती पिकवली जाणार आहे. त्यामुळे वीजबिल येणार नाही. बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला.०