शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कातील फरार देवेंद्र जैन याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:15 IST

पुणे : जमीन बळकावणे, धमकाविणे, खंडणी अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्काखाली कारवाई केल्यावर फरार झालेला पत्रकार देवेंद्र जैन ...

पुणे : जमीन बळकावणे, धमकाविणे, खंडणी अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर मोक्काखाली कारवाई केल्यावर फरार झालेला पत्रकार देवेंद्र जैन याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्यासह १३ जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली. तेव्हापासून तो फरार होता.

रवींद्र बऱ्हाटे या टोळीप्रमुखाने देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व इतरांच्या सहाय्याने अनेकांना जमीन व्यवहारात फसवणूक केली. त्यांच्या जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकावून खंडणी वसूल केली आहे. या टोळीवर असे १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात देवेंद्र जैन याच्याविरुद्ध बंडगार्डन, कोथरुड, हडपसर, समर्थ, हडपसर, चतु:श्रृंगी असे ८ गुन्हे दाखल आहेत. त्यातील हडपसर आणि चतु :श्रृंगीच्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्या फिर्यादीवरून कोथरुड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन देवेंद्र जैनसह चौघांना अटक केली होती. या गुन्ह्यात देवेंद्र जैन याला जामीन मिळाला होता. हडपसर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कारवाई केली. त्यानंतर देवेंद्र जैन फरार झाला होता.

या टोळीचा प्रमुख रवींद्र बऱ्हाटे याची पत्नी, मुलगा यांना पोलिसांनी अटक केली. दीड वर्षे फरार असलेला रवींद्र बऱ्हाटे हा पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर आता देवेंद्र जैनसमोरही पर्याय न राहिल्याने आज दुपारी तो पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला हडपसरच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

.......

राजस्थान, गुजरातपर्यंत पळाला

देवेंद्र जैन हा पुण्यातून पळून गेल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होता. तो काही दिवस अहमदनगर, ठाणे येथे राहिला होता. त्यानंतर राजस्थान, गुजरातमध्ये काही दिवस राहिला. तेथून तो हैदराबाद येथे गेला होता. असे त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पुढे आले आहे.