शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तेराशे कोटींचा विकास आराखडा मंजूर

By admin | Updated: March 4, 2017 00:49 IST

कृषी, औद्योगिक, पर्यटन, रस्ते, आरोग्य आणि तीर्थस्थळांच्या विकासाच्या तब्बल १३८० कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

पुणे : पुणे विभागातील कृषी, औद्योगिक, पर्यटन, रस्ते, आरोग्य आणि तीर्थस्थळांच्या विकासाच्या तब्बल १३८० कोटी रुपयांच्या आराखड्यास शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. त्यातील ४३९ कोटी रुपयांची विकासकामे एकट्या पुणे जिल्ह्यातच होणार आहेत.वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बोलविलेल्या बैठकीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील विकासकामांचा आराखडा सादर करण्यात आला. विधान भवनाच्या सभागृहात ही बैठक झाली. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, सोलापूरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, खासदार अनिल शिरोळे, खासदार रवींद्र गायकवाड, आमदार अनिल बाबर, मोहनराव कदम, उल्हास पाटील, सुरेश खाडे, भीमराव तापकीर, शिवाजीराव नाईक, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, आमदार मेधाताई कुलकर्णी, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) सुनील पोरवाल, कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा, पुणे विभागाचे आयुक्त एस. चोक्कलिंगम या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)>३८३ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणीपुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेअंतर्गत ४३९.०८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली असून, जिल्ह्यासाठी २८३.६६ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. त्यातील मृदसंधारणासाठी १५ कोटी ७५ लाख रुपये, तर ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी १२ कोटी ८० लाख रुपये देण्यात येणार आहेत. रस्ते बांधकामासाठी २० कोटी ४० लाख रुपये, तर रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी २३ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकाम व विस्तारीकरणासाठी ११ कोटी २६ लाख रुपये, महाराष्ट्र नगरोत्थान महाभियानासाठी १६ कोटी रुपये, अंगणवाडी बांधकामांसाठी १२ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. लघुपाटबंधारे, अंगणवाडी इमारतीचे बांधकाम, पर्यटन स्थळ व यात्रास्थळांच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यासाठी २२३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. कृषी व संलग्न सेवांसाठी २९ कोटी ६१ लाख, ग्रामीण विकासासाठी १७ कोटी ५१ लाख, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी १४ कोटी २५ लाख, परिवहन क्षेत्रासाठी ३१ कोटी ५० लाख, सामाजिक व सामूहिक सेवांसाठी १०६ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आराखडा २२८ कोटी ३७ लाख रुपयांचा असून, त्या अंतर्गत कृषी व संलग्न सेवेसाठी ३७ कोटी ५ लाख, ग्राम विकासासाठी १३ कोटी ५२ लाख, परिवहन सेवेसाठी ३३ कोटी १० लाख, सामाजिक व सामूहिक सेवेसाठी ७१ कोटी ३५ लाख आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ३४ कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सांगलीचा १९४ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासाठी २९४.९८ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा बैठकीत सादर केला. कृषी क्षेत्रासाठी ८०.६९ कोटी, सामाजिक सेवेसाठी ९५.६८ कोटी, ग्रामीण विकासासाठी २.९४ कोटी, पाटबंधारे व पूरनियंत्रणासाठी ६.४१ कोटी आणि परिवहन क्षेत्रासाठी ८२.२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.