शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याची प्रक्रिया अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 05:35 IST

शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आरखडा (डीपी) राज्य शासनाने मागील महिन्यात ताब्यात घेतल्यानंतर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित विकास आरखडा (डीपी) राज्य शासनाने मागील महिन्यात ताब्यात घेतल्यानंतर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीची पहिली बैठक गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. शासनाने हा डीपी ताब्यात घेतल्यानंतर तब्बल सव्वा महिन्याच्या कालावधीनंतर ही डीपीची प्रक्रीया पुन्हा सुरू झाली असून, पुढील पाच महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. महापालिकेने विहीत मुदतीत विकास आराखडा मंजूर करण्यास विलंब केल्याने राज्यशासनाने १९ मार्चला विकास आराखडा ताब्यात घेतला आहे. मात्र, शासनाने ही माहिती २७ मार्चला महापालिकेला कळवीत आराखडा ताब्यात घेत असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीला महापालिकेच्या डीपी सेलचे अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्याकडून डीपीच्या वाटचालीबद्दल माहिती देण्यात आली. डीपीची कागदपत्रे, नकाशे, हरकती सूचना, त्यावरील सुनावणीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु, सध्या विभागीय आयुत कार्यालयात कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा नाही. मंगळवारपर्यंत या कार्यालयातील एखादी रूम मोकळी करून त्या ठिकाणी कागदपत्रे ठेवण्यासाठी जागा करण्यात येईल. त्यानंतर सर्व कागदपत्रे मागावून घेण्यात येतील, असे विभागीय आयुक्तांनी या वेळी सांगितल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीमुळे अखेर डीपीच्या प्रक्रियेस पुन्हा सुरुवात झाली आहे.