शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-नृसिंहपूरचा तीन वर्षांत विकास

By admin | Updated: January 5, 2017 03:28 IST

नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षांत सर्वांगीण विकास करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नीरा-नृसिंहपूर/बावडा : नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानचा येत्या तीन वर्षांत सर्वांगीण विकास करणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या विकासासाठी २६० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यातील २२ कोटी रुपयांच्या विकास कामांचे आज नीरा-नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान प्राचीन आहे. येथे देशभरातून भाविक येतात. या भाविकांना चांगल्या सुविधा व्हाव्यात, यासाठी देवस्थानचा नियोजनबद्ध विकास करण्यात येत आहे. देवस्थानच्या विकासाबरोबरच परिसराचाही विकास होईल. त्याद्वारे स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होतील, याचा स्थानिक युवकांना लाभ होईल. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी २६० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून २२ कोटी आणि पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांची विकासकामे केली जात असल्याचे सांगितले.या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यटक निवास, भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृहाच्या कामांचे भूमिपूजन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी सार्वजनिक बांधकामचे मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर- सिंह, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, सार्वजनिक बांधकामचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, अधीक्षक अभियंता राजेंद्र राहणे, इंदापूरचे सभापती विलासराव वाघमोडे, पोलीस अधीक्षक जय जाधव, उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, सरपंच रूपाली काळे, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. गोपीचंद पडळकर, माऊली चवरे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे, अतुल तेरखेडकर, सदानंद शिरदाळे, मारुतराव वणवे, पांडुरंग शिंदे, तानाजीराव थोरात, अशोक वणवे, डॉ. नीलेश शिंगाडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुनाके यांनी सूत्रसंचालन केले.