शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पालिका भवनाचे होणार विस्तारीकरण

By admin | Updated: June 29, 2014 22:52 IST

महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणो : महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर पुणो महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार असली तरी, पालिकेचे विभाजन होणार की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, ही गावे समाविष्ट झाल्यानंतर प्रशासकीय कामांचा भार आणि नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पालिकेच्या मुख्य भवनाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावास शहर सुधारणा समितीच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि नगरसेवक महेंद्र पठारे यांनी हा प्रस्ताव समितीपुढे ठेवला होता. त्यानुसार, भवनाच्या मागील बाजूस असलेल्या निवडणूक कार्यालयाच्या जागेत ही इमारत आणि नवे सभागृह बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या अंतिम मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
जागेअभावी पालिकेची काही कार्यालये मुख्य भवनाच्या इमारतीव्यतिरिक्त सुरू आहेत. ही गावे आल्यानंतर आणखी कार्यालयांची गरज पालिकेस भासणार आहे. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने ही नवी कार्यालये इतरत्र निर्माण केल्यास  अनेक अडचणींचा सामना प्रशासनास करावा लागणार आहे. त्यामुळे 
नव्या इमारतीचा प्रस्ताव 
ठेवण्यात आला होता. त्यानुसार, मुख्य भवनाच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगच्या जागेतील निवडणूक कार्यालयाच्या ठिकाणी 
ही नवीन इमारत व सभागृह 
बांधण्यास शहर सुधारणा 
समितीने एकमताने मान्यता 
दिली आहे. (प्रतिनिधी)
 
च्राज्यशासनाने महापालिका हद्दीत नव्या गावांच्या समावेशाच्या हालचाली सुरू केल्या आहे. ही गावे समाविष्ट झाल्यानंतर महापालिका प्रशासनाचा भारही वाढणार आहे.
च्भविष्यात ही कार्यालये महत्त्वाची ठरणार असल्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून, लवकरात लवकर स्थायी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेने नंतर तो मार्गी लावण्यात येणार असल्याचे कर्णे यांनी सांगितले.