शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारावाढीसाठी करणार गायरानांचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:09 IST

पुणे : राज्यातील पशुधनाला वैरणीची कमतरता जाणवत असल्याने गावांमधील गायरानांचा विकास व सार्वजनिक विरळ क्षेत्रावर जनावरांसाठीच्या गवताची लागवड करण्यात ...

पुणे : राज्यातील पशुधनाला वैरणीची कमतरता जाणवत असल्याने गावांमधील गायरानांचा विकास व सार्वजनिक विरळ क्षेत्रावर जनावरांसाठीच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. राज्य पशुसंवर्धन विभाग याचे नियोजन करत आहे.

राज्यात सन २०१९ च्या पशुगणनेप्रमाणे गायवर्ग तसेच म्हैस, शेळी, मेंढी अशा सर्व प्रकारच्या जनावरांची संख्या ३ कोटी २८ लाख ८१ हजार २०८ आहे. त्यांंना दर वर्षी हिरवी वैरण १ हजार ३३४ लाख टन व वाळलेली ४२८ लाख ७७ हजार टन लागते.

राज्यात इतका चारा तयार होत नाही. दर वर्षी हिरव्या चाऱ्यात ४४ टक्के, तर वाळलेल्या चाऱ्यात २६ टक्के तूट येते. पावसाने ओढ दिली तर ही स्थिती आणखीन गंभीर होते. परराज्यातून चारा आयात करावा लागतो. उपलब्ध चारा काटकसरीने वापरात आणावा लागतो.

राज्यात १२ लाख १९ हजार हेक्टर गायरान क्षेत्र आहे. त्याशिवाय सार्वजनिक स्वरूपाचे विरळ क्षेत्र २१ हजार ४८४ चौरस किलोमीटर आहे. या दोन्ही क्षेत्रातल्या चारा उत्पादन क्षमतेकडे दुर्लक्ष होत आहे. गायरान क्षेत्र गावाचे सार्वजनिक क्षेत्र असतानाही त्यावर अन्य कारणांसाठी होते व गवतासाठी कमी क्षेत्र शिल्लक राहते. याच क्षेत्राचा गवत लागवड करण्याच्या दृष्टीने गवत व चारा धोरण आखणे व गवताळ भाग निश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात गवताच्या सुधारित प्रजाती तयार करण्यात आल्या आहेत. संकरित हत्ती गवत, शेवगा, शेवरी, हादगा, सुबाभूळ, दशरथ या गवताची लागवड केल्यास तूट कमी होईल अशी चर्चा समितीने केली. गायरान क्षेत्र विकसीत करणे, विरळ क्षेत्र गवत लागवडीखाली आणणे असे निर्णयही घेण्यात आले आहेत.

चौकट

जनावरांचा चारा जागेवरच उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चारा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटनांना या कामी सहभागी करून घेणार आहोत.

-डॉ. धनंजय परकाळे, अतिरिक्त आयुक्त, राज्य पशुसंवर्धन

----//

पशुधनाच्या तुलनेत राज्यात हिरवा चारा, वाळलेले गवत या दोन्हीत मोठी तूट आहे. गाय, म्हशीच्या दूध उत्पादनावर याचा थेट परिणाम होत असल्याने ही तूट भरून काढणे गरजेचे आहे. समितीच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न सुरू आहे.

गणेश देशपांडे- सदस्य सचिव, उपसंचालक, वैरण विकास.