शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी देवकाते की पवार?

By admin | Updated: March 21, 2017 05:07 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उद्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी बारामतीतून

पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उद्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी बारामतीतून विश्वास देवकाते, जुन्नरमधून पांडुरंग पवार हे प्रमुख दावेदार समजले जात आहेत. असे असले तरी अजित पवार यांचे धक्कातंत्र पाहता अध्यक्ष कोण होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पाच जण अध्यक्षपदासाठी इच्छुक असून यात तीन महिलांचा समावेश आहे. मात्र महिलांना देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. विश्वास देवकाते, पांडुरंग पवार यांच्यापैैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्षपद हे अडीच वर्षांसाठीच असणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सव्वा, सव्वा वर्षासाठी पदे देणार असल्याची चर्चा होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळून राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी, विविध समित्यांच्या ४ सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचेच सदस्य निवडून येणार, हे निश्चित आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित आहे. सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व विजयी उमेदवारांशी चर्चा केली. अध्यक्ष, उपाध्यक्षसह चारही सभापतिपदांसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे पत्रकारांशी बोलले. अध्यक्षपद हे मूळ मागास वर्गातीलच सदस्यांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी अध्यक्षपासाठी पाच व उपाध्यक्षदासाठी सहा जण इच्छुक असल्याचे सांगितले. अध्यक्षपदासाठी पांडुरंग पवार, विश्वास देवकाते, वैैशाली पाटील, सुचिता गावडे, कुसुम मांढरे व उपाध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, प्रवीण माने, विवेक वळसे-पाटील, शंकर मांडेकर, दिलीप घुले, सुजाता पवार इच्छुक आहेत.असे असले तरी जर अध्यक्षपद हे बारामतीला दिले तर उपाध्यक्षपद हे आंबेगावला जाण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद हे जुन्नरला गेले तर उपाध्यक्षपद हे बारामतीला मिळण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार अगोदरपासूनच मोर्चेबांधणी केली होती. आजही समर्थकांनी चांगलीच गर्दी केली होती. अजित पवार यांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच तालुक्यात पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनाच अध्यक्षपद दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. यानुसार बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा राष्ट्रवादीने मिळवल्या आहेत. त्यामुळे बारामती तालुक्याचा अध्यक्षपदावर दावा असून विश्वास देवकाते यांचे नाव चर्चेत आहे. मुलाखतीनंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगत, अध्यक्षपद मला मिळेल की नाही हे माहीत नाही, मात्र बारामतीला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते राजुरी-बेल्हा गटातून निवडून आलेले पांडुरंग पवार यांचे नावही चर्चेत आहे. पवार यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले असून, उपाध्यक्ष म्हणून कामदेखील केले आहे. त्यांनी आपण पक्षाकडे मागणी केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे इंदापूरच्या वैशाली पाटील यांनी अध्यक्षपदाची मागणी केली आहे. मुलाखतीदरम्यान बांधकाम समितीचा वरिष्ठांनी उल्लेख केला असता, माझी अध्यक्षपदाची मागणी असल्याचे ठामपणे सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांची निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर सभापती पदांसाठी निवडणूक होईल. (प्रतिनिधी)