शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! जिल्ह्यात मिठाईचोरच जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:28 IST

राज्यभरात पेट्रोलपंपावरील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने केलेल्या इंधनचोरीच्या घटना उघड होत आहेत. पुण्यात मात्र, पेट्रोलचोरांपेक्षा मिठाईचोर दुकानदार जास्त असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे

विशाल शिर्के पुणे : राज्यभरात पेट्रोलपंपावरील अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने केलेल्या इंधनचोरीच्या घटना उघड होत आहेत. पुण्यात मात्र, पेट्रोलचोरांपेक्षा मिठाईचोर दुकानदार जास्त असल्याची माहिती वैधमापन शास्त्र विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. मापात पाप करणे, छापील किमतीपेक्षा अधिक किमतीला पॅकबंद मिठाई विकण्यात स्वीट शॉप्स आघाडीवर असल्याचे अहवाल सांगतो.वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने जवळपास ४० विविध प्रकारच्या वस्तू आणि खाद्य पदार्थांच्या वजन मापांची वैधता तपासली जाते. अगदी वजन-काट्याच्या मापात कोण फेरफार करीत नाही ना?, छापील किमतीपेक्षा कोणी अधिक किमतीने माल विकत नाही ना? हेदेखील पाहिले जाते. त्यासाठी अचानकपणे तपासणी करण्याचे अधिकारदेखील या विभागाला आहेत.पेट्रोलपंप, केरोसिन विक्रेते, एलपीजी गॅस, सिनेमागृहातील विक्रेते, सिमेंट, स्टील, राईस मिल, मिठाईवाले, फळ-भाजी विक्रेते अशावजनाशी आणि वैध किमतीशी संबंधातील सर्व पदार्थांचा व्यवहार ‘वैध’ मार्गाने चालतो की नाही, हे पाहण्याचे काम या विभागाच्या माध्यमातून केले जाते.या विभागाने मार्च २०१६ पर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. त्या नुसार २०१२ ते २०१६ या कालावधीत ५० स्वीट शॉप्समध्ये मिठाईच्या मापात पाप केल्याची कारवाई वैधमापन विभागाने केली असून, १२० जणांना मापे प्रमाणित करुन न घेतल्याने कारवाईला सामोरे जावे लागले आहे. तर, ७९ प्रकरणांत पाकिटावरील छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्याने कारवाई करण्यात आली आहे. तर, पाकीटबंद वस्तूंच्या नियमांचे भंग केल्याप्रकरणी २२३ जणांवर कारवाई झाली आहे. या प्रकरणी या व्यावसायिकांकडून तब्बल १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वजनात घट, पाकीटबंद वस्तूंची अधिक दराने विक्री आणि वजनमापे प्रमाणित नसणे अशा सर्वच प्रकारात स्वीट शॉप्स आघाडीवर असल्याचे अहवाल सांगतो. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघड केली आहे.