शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

बदली होऊनही अधिकारी पालिकेतच कार्यरत

By admin | Updated: July 7, 2016 03:39 IST

बदली झाल्यानंतरही महापालिकेतील पद सोडवत नसलेल्या अधिकाऱ्यांना वेतन अदा केले जात असल्याबद्दल पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालय (वेतन विभाग) यांनी हरकत

पुणे : बदली झाल्यानंतरही महापालिकेतील पद सोडवत नसलेल्या अधिकाऱ्यांना वेतन अदा केले जात असल्याबद्दल पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालय (वेतन विभाग) यांनी हरकत घेतली आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागानेही त्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसल्याबाबत विचारणा केली आहे. नगरसेवकांमध्येही अशा अधिकाऱ्यांबाबत तीव्र नाराजी असून, त्याचे पडसाद स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत उमटले.महापालिकेत राज्य सरकारच्या विविध विभागांकडून प्रतिनियुक्तीवर म्हणून अधिकारी पाठवले जात असतात. त्यांनी किती काळ पालिकेत काम करावे, याबाबत निश्चित ठरलेले असते. तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ते पालिकेत कार्यरत राहिल्यास त्यांना परत त्यांच्या मूळ विभागात नियुक्ती दिली जाते. असे असूनही काही अधिकाऱ्यांना मात्र अभय मिळालेले दिसते आहे. प्रशासनात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नोव्हेंबर २०१३ मध्ये फक्त वर्षभराकरिता महसूल व वन विभागातून पाठवण्यात आले होते. सलग ४ वर्षे झाली तरीही हा अधिकारी अद्याप पालिकेतच कार्यरत आहे. संबंधित अधिकाऱ्याची सरकारने बदली केली; मात्र वर्ष उलटले तरीही त्याने तिथे रुजू होणे विविध कारणे देत टाळले आहे. त्यामुळे आता त्याच्या वेतनावर पालिकेच्या अंतर्गत लेखानिरीक्षण कार्यालयाने (वेतन विभाग) हरकत घेतली आहे. सन २०१४ पासून त्यांना वेतन अदा कसे केले जात आहे, अशा स्वरूपाची ही हरकत आहे. यासंबधी लोकशाही दिन ग्रुपचे पदाधिकारी व पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी रमेश खामकर यांनी सरकारकडे विचारणा केली होती. त्यावरून राज्य सरकारच्या नगर विकास विभागानेही संबंधित अधिकाऱ्याकडे खुलासा मागितला असल्याचे समजते.नगरसेवकांमध्येही अशा अधिकाऱ्यांबाबत नाराजी आहे. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत समिती सदस्य सुनील गोगले यांनी याबाबत थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच विचारणा केली. (प्रतिनिधी) वर्षानुवर्षे करावे लागते एकच कामपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही या अधिकाऱ्यांबाबत रोष आहे. हितसंबध निर्माण होतात म्हणून आयुक्त पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची अंतर्गत बदली करतात. सरकारनियुक्त अधिकाऱ्यांना मात्र वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे काम देण्यात येते, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.- सरकारनियुक्त अधिकाऱ्यांना प्रशासन, मालमत्ता व्यवस्थापन अशी लोकसंपर्क नसलेली कामे सोपविण्यात येतात व पालिकेच्या मूळ अधिकाऱ्यांना मात्र कचरा, आरोग्य, रस्ते दुरुस्ती अशी तक्रारींची संख्या जास्त असलेल्या कामांची जबाबदारी देण्यात येते, असे गोगले यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले. तसेच बदली होऊनही अधिकारी पालिकेतून का जात नाही, त्यांना पाठीशी का घातले जाते, अशी विचारणा त्यांनी केली. आयुक्त यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे गोगले यांनी सांगितले.