पुणे : सिंहगड पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने एका विषयात नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आंबेगाव बुद्रुकच्या कावेरी हॉस्टेलमध्ये घडली. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यश राहुल बोराटे (वय १७, रा. कावेरी हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशचे आईवडील शेतकरी असून, तो मूळचा मोशी येथील बोराटेवस्ती येथील रहिवासी आहे. दहावी झाल्यावर त्याने सिंहगड महाविद्यालयाच्या वेणुताई चव्हाण पॉलिटेक्निक संस्थेमध्ये डिप्लोमासाठी प्रवेश घेतला होता. संस्थेच्या कावेरी हॉस्टेलमधील १७ क्रमांकाच्या खोलीमध्ये तो राहत होता. त्याची नुकतीच परीक्षा झाली होती. एका विषयात नापास झाल्यामुळे तो सतत तणावाखाली वावरत होता. पुढील तपास हवालदार नितीन शिंदे करीत आहेत. (प्रतिनिधी)सहकारी धावले मदतीसाठी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्याचे सर्व मित्र खोलीमधून बाहेर गेले. त्यानंतर त्याने कपडे वाळत घालण्याच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्याचे मित्र खोलीत परत आले, तेव्हा यशला फाशी घेतलेल्या अवस्थेत पाहिले. आरडाओरडा करीत शेजारच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याला खाली उतरवत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला उपचारांपूर्वी मृत घोषित केले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. यशचे आईवडील शेतकरी असून, तो मूळचा मोशी येथील बोराटे वस्ती येथील रहिवासी आहे. हॉस्टेलमधील १७ क्रमांकाच्या खोलीमध्ये तो राहत होता.यशच्या आत्महत्येमुळे विद्यार्थी संतप्त पुणे : सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध असती तर यश बोराटे या विद्यार्थ्याचा जीव वाचला असता, असा आरोप करीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात गुरुवारी आंदोलन केले.आंबेगाव येथील सिंहगडच्या कावेरी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खानावळीच्या जेवणामुळे पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनातर्फे काही महिन्यांपूर्वी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, चार दिवसांनंतर ही सुविधा तत्काळ बंद करण्यात आली. वेणुताई चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेणाऱ्या यश बोराटे या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, यशला दरवाजा तोडून खाली उतरविण्यात आले. त्या वेळी त्याच्या शरीराची हालचाल होत होती. त्याला रुग्णवाहिकेतून तत्काळ रुग्णालयात दाखल केले असते, तर त्याचा जीव वाचला असता. मात्र, रुग्णवाहिका नसल्याने यशला दुचाकीवरून रुग्णालयात घेऊन जावे लागले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी तीव्रसंपात व्यक्त केला. तसेच, महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.(प्रतिनिधी)
नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या
By admin | Updated: January 13, 2017 03:38 IST