शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यातून मुलाच्या खुनाचा प्रयत्न

By admin | Updated: May 3, 2017 02:54 IST

नैराश्याचा विकार जडलेल्या महिलेने स्वत:च्या मुलाचे कसे होणार, अशा शंकेतून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घातला आणि स्वत:ही

पुणे : नैराश्याचा विकार जडलेल्या महिलेने स्वत:च्या मुलाचे कसे होणार, अशा शंकेतून त्याच्या डोक्यात दगडी पाटा घातला आणि स्वत:ही पाट्यावर डोके आपटून घेतले. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून अकरा वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. तो आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन अजित चव्हाण (२१५ , गणपती निवास, गुरुवार पेठ) असे मुलाचे नाव आहे. तो शनिवार पेठेतील शाळेत ५ वीमध्ये शिकतो. त्याचे अभ्यासात काहीसे दुर्लक्ष असल्याचे त्याच्या आईला वाटत होते. त्याचे पुढच्या काळात कसे होणार, या काळजीत ती असते. त्याच्या आईला दोन महिन्यांपासून नैराश्याचा विकार आहे. सोमवारी सकाळी 8च्या सुमारास या मुलाचे वडील अजित चव्हाण (वय ४२) लहान मुलीसह देवदर्शनासाठी गेले होते. त्यावेळी भ्रमातून रागाच्या भरात या महिलेने मुलाच्या डोक्यात दगडी पाटा घातला. स्वत:ही पाट्यावर डोके आपटले. या मारामुळे हर्षवर्धन जबर जखमी झाला आणि बेशुद्ध झाला. ही महिलाही बेशुद्ध झाली. अजित चव्हाण घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी हाक मारूनही प्रतिसाद मिळाला नाही. हात घालून कडी काढता येत असल्याने त्यांनी दार उघडले, तेव्हा दोघेही जखमी असल्याचे दिसून आले. दोघांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. अजित चव्हाण यांच्या फिर्यादीवरून या महिलेवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक व्हि. डी. केसरकर तपास करत आहेत.मुलाचे अभ्यासात दुर्लक्ष होत असल्याने चिंतित झालेल्या आईने नैैराश्यातून मुलाच्या खुनाचा प्रयत्न केला.