शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांचे डोळे लागले यादीकडे

By admin | Updated: January 30, 2017 03:10 IST

युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे

पुणे : युती तुटल्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील अनेक इच्छुकांना आनंदाचे भरते आले आहे. जल्लोष करून त्यांनी स्वतंत्रता साजरी केलीच, पण आता त्यांच्यातील इच्छुकांचे डोळे उमेदवारांच्या यादीकडे लागले आहेत. बऱ्याच वर्षांची इर्षा समोरासमोर काढण्याची संधी मिळाल्याने दोन्ही पक्षांतील अनेक संभाव्य उमेदवार तयारीलाही लागले आहेत.सांगताही येत नाही व सहनही करता येत नाही, अशा युतीतील अनेकांची स्थिती होती. काहींनी यापुर्वीच्या निवडणुकीत बंडखोरीही करून पाहिली, पण पक्षाची मते मिळाली नसल्याने त्यांना अपयश पाहावे लागले. आता पक्ष बरोबर आहे, मैदान मारणारच असे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. शहराच्या मध्यभागातील प्रभागांमध्ये प्रामुख्याने ही लढाई रंगणार, असा काहींचा होरा आहे. तिथे भाजपाचे वर्चस्व आहे, मात्र ते शिवसेनेच्या सहकार्यातून तयार झाले होते, आता शिवसैनिक फक्त शिवसेनेचाच प्रचार करतील व त्यातून खरी ताकद कोणाची ते समजून येईल, असे सांगण्यात येत आहे.भाजपाच्या गोटातही या लढाईचा सामना कसा करायचा, यावर मंथन सुरू झाले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासमवेत शहराच्या पेठांमधील जनसंघापासूनच्या काही ज्येष्ठांची एक बैठक झाली असल्याची माहिती मिळाली. परिवारातील अनेक संघटनांचे पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. मतदार आपलाच आहे, शिवसेनेवर टीका करून त्याला अस्वस्थ करायचे नाही, असा निर्णय या बैठकीत झाला असल्याचे समजते. आपला उमेदवार घरोघरी कसा जाईल, याची आखणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.दोन्ही पक्षातील नेत्यांच्या स्तरावरही याची मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेने आक्रमकपणा न सोडता भाजपावर टीकेचा भडिमार करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील १० वर्षांत भाजपानेच काँग्रेस व राष्ट्रवादीला वेळोवेळी साथ दिली, त्यामुळेच शहराचा विकास खुंटला, या मुद्द्यावरून भाजपाला जेरीस आणायचा शिवसेनेच्या नेत्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येते. परिवर्तन मोर्चाला याच मुद्द्यावर नागरिकांची साथ मिळाली, त्यामुळे तोच मुद्दा घेऊन पुढे जाण्याचे ठरवण्यात आले आहे. पोस्टर, पत्रके तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळाली.भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पदाधिकारी व उमेदवार, कार्यकर्त्यांना घाई करू नका, असा सल्ला दिला आहे. ते काय करतात ते पाहून नंतर प्रतिक्रिया द्या, ती मुद्देसूद असेल याची काळजी घ्या, असे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. स्वत: होऊन शिवसेनेच्या कोणत्याही उमेदवाराच्या वाटेला जाण्याचे कारण नाही, मात्र त्यांच्याकडून आरोप झाल्यानंतर ऐकूनही घ्यायचे नाही, अशा प्रकारे सामना करण्यास सांगण्यात आले आहे.