शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांकडून खर्चाला कात्री

By admin | Updated: January 11, 2017 03:53 IST

नोटाबंदीमुळे रोख रकमेच्या खर्चावर मोठ्या प्रमाणात गडांतर आल्याने इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी करण्याच्या खर्चावर मर्यादा येत आहेत

पुणे : नोटाबंदीमुळे रोख रकमेच्या खर्चावर मोठ्या प्रमाणात गडांतर आल्याने इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकीसाठी करण्याच्या खर्चावर मर्यादा येत आहेत. इच्छुक उमेदवारांना अनेक खर्चांना कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीवर दुसरा पर्याय शोधून रोख रक्कम जमा करण्याचे प्रयत्न इच्छुकांकडून केले जात असले तरी त्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाला आता दोन महिने उलटले असून, दैनंदिन व्यवहार थोडेसे सुरळीत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र रोखीने होणाऱ्या मोठ्या व्यवहारांवर गडांतर आले आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्र्श्वभूमीवर बहुतांश इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम बाळगलेली होती. ही सर्व रक्कम ५०० व १००० रुपयांच्या नोटांमध्ये होती. मोदी यांच्या घोषणेनंतर या इच्छुकांना मोठे टेन्शन आले होते. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जुना नोटा बदलून घेणे, सोने खरेदी,  ३० टक्के कमिशनच्या बदल्यात नोटा बदलून घेणे, निवडणुकीच्या खर्चाची रक्कम अगोदरच जुन्या नोटांमध्ये अ‍ॅडव्हान्स देणे, मंडळे, कार्यकर्ते, बचत गट यांना अगोदर जुन्या नोटांमध्ये पैसे देऊन टाकणे आदी मार्गांनी जुन्या नोटांच्या रोख रकमेची विल्हेवाट इच्छुकांकडून लावण्यात आली. जुन्या नोटांची विल्हेवाट लावल्यानंतर आता त्यांची बहुतांश रक्कम बँकेत जमा झालेली आहे. बँकेतून आठवड्याला फक्त २४ हजार रुपये रोख स्वरूपात दिले जात आहेत. मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी करावे लागणारे खर्च हे लाखांच्या घरात आहेत. प्रभागातील नागरिकांना देवस्थानांच्या यात्रा घडविणे, मनोरंजनाचे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करणे, संक्रांतीसाठी करावे लागणारे वस्तूंचे वाटप अशा अनेक कारणांसाठी पैशांची आवश्यकता भासत आहे. काही खर्च आॅनलाइन स्वरूपात करता येत आहेत, मात्र सर्व खर्च हा आॅनलाइन पद्धतीने केल्यास आयकर विभागाच्या तो रडारवर येऊ शकतो याची भीती इच्छुकांना वाटत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी निवडणुकीवरच्या खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात  केली आहे.  निवडणुकांमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते, या काळात बाजारामध्ये तेजीचे वातावरण असते. मात्र नोटाबंदीमुळे निवडणुका अगदी जवळ आल्या असतानाही बाजारात अजून मंदी जाणवत आहे. (प्रतिनिधी)