शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कसा पाहता येईल जेतेपदासाठीचा ऐतिहासिक सामना?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

‘रुपी’च्या ठेवीदारांचा अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: March 5, 2016 00:37 IST

बुधवारी सासवडच्या रुपी बँकेत खळबळ उडाल्याने गुरुवारी (दि. ३) बँकेच्या १०० खातेदारांनी बँकेत दिवसभर ठिय्या मांडला.

खळद : बुधवारी सासवडच्या रुपी बँकेत खळबळ उडाल्याने गुरुवारी (दि. ३) बँकेच्या १०० खातेदारांनी बँकेत दिवसभर ठिय्या मांडला. त्या खातेदारांना साह्य करण्यासाठी इतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जमून बँक व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे शेवटी त्यांनी बँकेचे जनरल मॅनेजर एन. वाय लोखंडे यांना बोलावून घेतल्यानंतर, त्यांनी सर्व खातेदारांची समजूत काढली.दरम्यान, ‘आम्ही आता गप्प बसणार नाही.’ असा निर्णय घेऊन येत्या मंगळवार, दि. ८ रोजी बँकेच्या दारातच तालुक्यातील खातेदारांचा जाहीर मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याला बँकेचे प्रशासक मंडळ उपस्थित न राहिल्यास, यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला. एका महिलेने सासवड शाखेत विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे बँक व्यवस्थापनाची पळता भुई थोडी झाली. या घटनेमुळे सर्वत्र धावपळ सुरू झाली. उपस्थित असणाऱ्या सर्वच शेतकरी खातेदारांनी शाखाधिकारी व्ही. व्ही. बहुलेकर यांना धारेवर धरत असताना, त्यांनी अक्षरश: बैठकीतून पळ काढला. याबाबत वृत्त प्रसारित होताच या महिलेला ५० हजार रुपयांचा धनादेश थेट खात्यात जमा केला. दुपारी चार वाजता लोखंडे बँकेत आल्यानंतर, त्यांची प्रशासनाच्या वतीने त्यांची बाजू मांडली. मात्र, तरीही त्यांचे समाधान न झाल्याने शेवटी मंगळवार, दि. ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बँकेच्या दारात जाहीर मेळावा घेण्याचे निश्चित करून या बैठकीत बँकेचे सर्व प्रशासक उपस्थित करावे, अशी मागणी लोखंडे यांच्याकडे करण्यात आली. या बैठकीत ठोस निर्णय न घेता उडवाउडवीची उत्तरे दिल्यास त्याच क्षणी यापेक्षा मोठे आंदोलन उभारून प्रशासनाला धारेवर धरण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी जवळपास ६ वाजता ठिय्या आंदोलन थांबविण्यात आले. (वार्ताहर)