शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

समाजविकासासाठी दिली बहिणीची जमा बचत रक्कम

By admin | Updated: February 9, 2017 02:58 IST

काळेवाडी (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब काळे यांनी त्यांची मृत बहीण विमल मधुकर कोकाटे यांचे बचतीचे १ लाख २६ हजार रुपये परिसरातील विविध समाजविकास कामांसाठी देऊन

गराडे : काळेवाडी (ता. पुरंदर) येथील बाळासाहेब काळे यांनी त्यांची मृत बहीण विमल मधुकर कोकाटे यांचे बचतीचे १ लाख २६ हजार रुपये परिसरातील विविध समाजविकास कामांसाठी देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.समाजात माणसांमाणसांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष, वादविवाद, मतमतांतरे होत आहेत. सध्या माणसे माणसांच्या जिवावर उठून ऐकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. माणुसकीचा झराही आटत चालला आहे. सगळ्या प्रकारच्या नात्यांमध्येही कटूता वाढू लागली आहे. अशा वातावरणातही माणुसकी, चांगले विचार टिकून आहेत. समाजहिताची तळमळ असणारी काही माणसे आपल्या वागणुकीने अनेकांची मने जिंकतात. असेच एक दुर्मिळ उदाहरण काळेवाडीत घडले.बाळासाहेब काळे यांच्या थोरल्या भगिनी विमल कोकाटे यांचे वयाच्या ७८व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ३५ वर्षे ससून रुग्णालयात आया म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मागे कोणीही वारसदार नव्हते. त्या आपला भाऊ बाळासाहेब काळे यांच्याकडेच राहत होत्या. त्यांनी बँकेमध्ये बचत करून १ लाख २६ हजार रुपयांची रक्कम ठेवली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ही रक्कम समाजाविकासासाठी खर्च करू, असा विचार बाळासाहेब काळे यांनी बहीण कुसुम मोडक, पत्नी शोभा, मुलगा रमाकांत, सून राजश्री यांच्यापुढे मांडला. या सर्वांनी त्याला तत्काळ होकार दिला.त्याप्रमाणे काळेवाडी येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी ५१ हजार रुपये सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र काळे यांच्याकडे दिले. दिवे येथील जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालयाच्या नवीन शाळा बांधकामासाठी ५१ हजार रुपये मुख्याध्यापक बाळासाहेब झेंडे यांच्याकडे दिले. काळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक सुधारणेसाठी १५ हजार मुख्याध्यापिका राजश्री मोरे यांच्याकडे दिले. तर, जाधववाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळाविकासासाठी ११ हजार रुपये मुख्याध्यापक सुनील लोणकर यांच्याकडे दिले.बाळासाहेब काळे हे मूळचे दिवे गावाजवळील काळेवाडीचे रहिवासी आहेत. ते भोर तालुक्यातील किकवी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात ३२ वर्षे सेवा करून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते काळेवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयाचे नियोजन व शेतीव्यवसाय सांभाळतात.(वार्ताहर