शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची रक्कम होणार बँकेत जमा

By admin | Updated: November 14, 2016 02:09 IST

सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे खातेक्रमांक वेळेत प्राप्त करण्याकरिता एकात्मिक आदिवासी

मंचर : सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे खातेक्रमांक वेळेत प्राप्त करण्याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्या वतीने मंगळवारी शिबिराचे आयोजन केले असून, खातेक्रमांक तत्काळ द्या, असे आवाहन आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय घिसे व सरचिटणीस सुनील भेके यांनी दिली.शिष्यवृत्तीचे वाटप तातडीने करण्याची मागणी शिक्षक संघाच्या वतीने प्रकल्प कार्यालय घोडेगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतु आदिवासी विकास विभागाच्या ११ मार्च २0१६ च्या परिपत्रकानुसार सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते.शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाने शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचे खातेक्रमांक उपलब्ध नसल्यास त्यांच्या पालकांचे खाते क्रमांक नमूद करावेत, असे आवाहन आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे विस्तार अधिकारी नवनाथ भवारी यांनी मुख्याध्यापकांना केले आहे. (वार्ताहर)