पुणे :
* आरोग्य विभाग
कोरोना आपत्तीच्या अनुषंगाने व महापालिका उभारत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागासाठी भांडवली तरतूद २२३़ ९५ कोटी व महसूली तरतूद ३५०़ ०८ कोटी अशी ५७४ कोटी रूपये तरतूद केली आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षाकरिताही नियोजन करताना, महाविद्यालय उभारणी करून शंभर विद्यार्थ्यांना या वर्षात प्रवेश मिळेल याकरिताचे नियोजन केले आहे़
--------------------
नगर नियोजन
महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांचा टी़ पी़ स्किम राबविण्याबरोबरच, ११० कि़मी़ अंतराचा बाह्यवळण रस्ता ताब्यात घेणे व लगतच्या भागाचा सुनियोजित विकास करणे यावर यावर्षी लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे़
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हडपसर, खराडी व वडगाव खु़ येथे ६ हजार २६४ पैकी एकूण २ हजार २३४ सदनिकांचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे़
------------------
वाहतुक नियोजन व प्रकल्प
याकरिता भांडवली तरतूद ६२०़ ९० कोटी व महसूली तरतूद ३०़ ०५ अशी ६५०़ ९५ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे़ आगामी वर्षात विश्रांतवाडी, कल्याणीनगर, सिहंगड रोड येथे उड्डाणपूल बांधण्याबरोबरच इलेक्ट्रिक बस, मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिताआर्थिक तरतूदी करण्यात आल्या आहेत़
------------------
पथ विभाग
या विभागासाठी भांडवली तरतूद ७३०़ ३६ कोटी व महसूली तरतूद १०५़ ५७ कोटी अशी ९२५ कोटी ९३ लाख रूपयांची तरतूद आहे़
यात पीपीपी तत्वावर रस्ते विकसित करणे, आठ ठिकाणी १० किमी अंतराचे सायकल ट्रॅक उभारणे, लहान मुलांसाठी वाहतुक विषयक प्रकल्प राबविणे आदी योजनांचा समावेश आहे़