शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

डेंटिस्टचे पितळ पेशंटसमोरच उघडे

By admin | Updated: June 29, 2017 03:23 IST

दोन पेशंटला एकाच कंपनीच्या दातांच्या क्लिपचे वेगवेगळे दर सांगून पेशंटकडून जादा रक्कम उकळल्याने डॉक्टरांचे पितळ

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : दोन पेशंटला एकाच कंपनीच्या दातांच्या क्लिपचे वेगवेगळे दर सांगून पेशंटकडून जादा रक्कम उकळल्याने डॉक्टरांचे पितळ पेशंटसमोरच उघडे झाल्याने डॉक्टरांची चांगलीच भंबेरी उडाली़ मंचर येथील दातांचे डॉक्टर असलेल्या दाम्पत्यांचा अनुभव एका पेशंटला आला. विशेष म्हणजे ज्या पेशंटला अनुभव आला तो पेशंट डॉक्टरांच्या अत्यंत जवळचा नातेवाईकाचा मित्र असल्याने डॉक्टरांची मोठी पंचायत झाली़ नारायणगाव येथील दाम्पत्य हे आपल्या पत्नी व मुलीला दातांची क्लिप बसविण्यासाठी मंचर येथील नामांकीत डॉक्टर दाम्पत्यांकडे गेला होता. मितभाषी असलेले या डॉक्टर दाम्पत्यांकडे पुणे येथून तज्ज्ञ डॉक्टर क्लिप बसविण्यासाठी येत असतात़ डॉक्टर दाम्पत्याने पेश्ांटहा आपल्या नातेवाईकांचा मित्र असल्याने क्लिपचे दर स्वत: न सांगता हॉस्पिटल मधील सिस्टर व वार्डबॉय मार्फत दर सांगितले. चार कंपन्याचे क्लिपचे दर अनुक्रमे २२ हजार, २४ हजार, २५ हजार आणि ३२ हजार असे सांगण्यात आले़ संबंधितांनी २४ हजारांची क्लिप बसविण्याचे निश्चित केली व पत्नी आणि मुलीच्या क्लिपकरिता अ‍ॅडव्हान्स रक्कम १० हजार रुपये जमा केले़ रक्कम जमा केल्यानंतर मुलीला क्लिप बसविण्यासाठी डॉक्टरांनी आत नेले़ सचिन व त्यांची पत्नी डॉक्टर समोरच बसलेले होते़ याचवेळी दुसऱ्या पेशंटची तपासणी झाल्यावर तो पेशंट शेजारी बसला़ डॉक्टरने दाखविलेल्याच क्लिपा दुसऱ्या पेशंटच्या मुलाला दाखविल्या व त्या क्लिपांचे दर २० हजार, २२ हजार, २५ हजार असे सांगितले़ त्याचवेळी जी क्लिप निश्चित केली होती. त्याला दर २४ हजार सांगितला होता . हीच क्लिप दुसऱ्या पेशंटला २२ हजार रुपयास सांगितल्याने ही बाब त्या पेशंटच्या लक्षात आली़ मात्र महिला डॉक्टरच्या लक्षात आली नाही़ दर पाहिल्यानंतर पेशंटने डॉक्टरांना थेट प्रश्न करून या क्लिपचे आपण मला २४ हजार रुपये सांगितले व त्याच कंपनीची क्लिप या पेशंटला २२ हजार रुपये सांगितले़ आपणांस २ हजार रुपये प्रमाणे दोन क्लिपांचे ४ हजार रुपये वाढीव सांगितल्याचे निदर्शनास आणून देताच डॉक्टराचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच डॉक्टरने सारवासरव करीत दातांच्या गॅपनुसार क्लिपचे दर असतात, असे सांगून आपली चोरी लपविण्याचा प्रयत्न केला़