शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

सुपे परिसरात डेंगीसदृश रुग्ण

By admin | Updated: February 4, 2015 00:21 IST

मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.

सुपे : सुपे (ता. बारामती) परिसरात मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली.मागील आठवड्यात सुपे येथील एक ग्रामस्थ तब्येत बरी नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. या वेळी त्याच्या रक्ताच्या चाचण्या करण्याचा सल्ला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. व्ही. झेंडे यांनी दिला. या वेळी त्याला रक्ताच्या चाचण्यांमध्ये डेंगीची लागण झाल्याचे आढळले. त्याला ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. येथील खासगी हॉस्पिटलमध्ये खैरेपडळ (ता. बारामती) येथील एकास डेंगीची लक्षणे आढळून आली होती. त्यास पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश लोणकर यांनी दिली. त्यामुळे सुपे व खैरेपडळ या ठिकाणी फॉगिंग मशिनने धुरळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. पी. वाघमारे यांनी सांगितले, की सुपे परिसर आणि खैरेपडळ येथे डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. त्यानुसार खालची पेठ आणि आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हेक्षणाचे काम करण्यात आले. या वेळी खालच्या पेठेत एसटी स्टँड परिसरातील हनीफ हुसेन पिरजादे यांच्या घरातील साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये लारवा आढळून आल्या. याबाबत आरोग्य सेवक एस. एस. काशिद यांनी माहिती दिली.